वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने पावसाचे सावट असलेल्या वातावरणात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय वेस्ट इंडिजच्या सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवीत पाकिस्तानला एका मागून एक धक्के दिले. तिसऱ्याच षटकात इमाम-उल-हक (२) याला माघारी धाडत वेस्ट इंडिजने सुरेख सुरुवात केली. वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी आखूड टप्प्याच्या चेंडूंनी पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो कि पळो करून सोडले. फकर झमान (२२), बाबर आझम (२२), वहाब रियाझ (१८) व मोहम्मद हाफिज (१६) यांचा अपवाद वगळता एकही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. वेस्ट इंडिजच्या ओशेन थॉमस याने भेदक मारा करीत केवळ २७ धावांत चार गडी टिपले तर कर्णधार होल्डरने ४२ धावांत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. आंद्रे रसेलने दोन तर कॉट्रेलने एक गडी बाद केला. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानची हि आतापर्यंतची दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. १९९२च्या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध केलेल्या ७४ या त्यांच्या सर्वात कमी धावा आहेत.
१०६ धावांचं माफक आव्हान पेलण्यास उतरलेल्या वेस्ट इंडिजने काहीशी सावध सुरुवात केली. ख्रिस गेलं व शाई होप्स या जोडीने २७ चेंडूंत ३६ धावांची सलामी देत डावाची आखणी केली. अनुभवी गेलने आपला अनुभव पणाला लावत अर्धशतक लगावले. त्याने ३४ चेंडूंचा सामना करीत सहा चौकार व तीन उत्तुंग षटकार खेचत ५० धावा केल्या. निकोलस पुरननेही (३४) गेलला चांगली साथ देत वेस्ट इंडिजला एल सोपा विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून तिन्ही गडी मोहम्मह आमिरने बाद केले. थॉमसच्या कामगिरीला सामनावीराचा पुरस्कार दिला.
]]>