क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ “तात्याराव” ही व्यक्ती समजून घेण्यास खूप अवघड आहे, आणि ज्यांना ती समजते त्यांना पचवून घेण्यास खूप अवघड आहे. कैदी म्हणून बोटीतून नेले जात असताना थेट समुद्रात झेपावण्याचं धाडस करणाऱ्या,अंदमानच्या अंधार कोठडीतही स्वातंत्र्याचे स्वप्न पाहू शकणाऱ्या ह्या वीर विनायकाचे कर्तृत्व लेखात, चौकटी पुस्तकात मावणारे नाही. आपले अख्खे ८३ वर्षांचे आयुष्य राष्ट्रप्रेमात खर्ची घातलेल्या वीर विनायकाला काही पुस्तकं वाचून चार दिवसांत समजून घेण्याचा प्रयत्न हा माझ्या सारख्यांचा मूर्खपणा नाही तर काय?
सावरकर ही काही सामान्य व्यक्ती कशी असू शकेल ! घरादाराची राखरांगोळी करून अख्खे कुटुंबच जळत्या अग्नित लोटलेला हा माणूस ब्रिटिशांच्या घरात जाऊन त्यांच्याच विरुद्ध कटकारस्थानं रचत होता. जेव्हा त्यांना ब्रिटन मध्ये अटक झाली, त्या नंतर मोठ्या धाडसाने मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेऊन ह्यांनी अख्ख्या जगाचं लक्ष भारतात चालू असलेल्या ब्रिटिश छळाकडे वेधलं गेलं. प्रत्यक्ष ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला माफी मागावी लागली हे सामान्य माणसाचं लक्षण नव्हे. पण साक्षात त्यांच्यात स्वतःच्या देशात त्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा अवहेलना. परक्या देशात त्यांचे स्मारक होते आणि अजून ज्या देशासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले, तोच देश त्यांची अजूनही उपेक्षा करतो. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अजूनही देत नाही (कालच्या पोराटोरांना वयाच्या ४० व्या वर्षी दिला जातो ) अजून किती उपेक्षा व अवहेलना करणार आहोत आम्ही तुमची.
मुळात सावरकर हा विषय शाळेतील मुलांपुढे अगदी मोजून मापून मांडला गेला त्यामुळे आम्ही नको त्या माणसाला बापूजी म्हणून आदराने वागवतो, तसं “तात्याराव” म्हणून कुणाला आदराने बोलावं अशी शिकवण आम्हाला मिळाली नाही. पण उशिराने का होईना,ह्या सावरकर नामक मनुष्याला “स्वातंत्र्यवीर” असं का संबोधतात ह्याचा उलगडा होत गेला.
तात्याराव तुमच्या पायाची धूळ पण व्हायची माझी पात्रता नाही हे मी जाणतो, तर मी तुमच्यावरच काय बोलणार . पण हात जोडून एक नम्र विनंती नक्कीच करावीशी. अशा या महान राष्ट्रभक्त व्यक्तिमत्त्वास त्यांच्या जयंती दिनानिमित्त कोटी कोटी वंदन !!!
संकलन :- डॉ अविनाश ग. नादरपूरकर
]]>