राष्ट्रभक्तीचा संगम, क्रांतीगिताजी महाबळ

१० मे आजच्या दिवशी म्हणजेच १८५७ साली इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध महायुद्ध उभे राहिले. क्रांतिकारकांच्या रुपात साक्षात शिवानेच परकीय सत्तेच्या उरावर तांडव केले. त्या आपल्या तमाम ज्ञात अज्ञात वीर पूर्वजांना विनम्र अभिवादन.
याच क्रांतीची, राष्ट्राभिमानाची, राष्ट्रभक्तीची झलक ज्यांच्या वाणीतून जाणवते. ज्या कायम पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. ज्यांचा आवाज जेवढा पहाडी तेवढाच गाताना कोमळ आहे. वक्तृत्व ज्यांचे स्पष्ट आणि रोखठोक आहे. आपल्या वडिलांचा वारसा ज्या सर्वार्थाने समर्थपणे चालवत आहेत. ज्यांचे कुशल नेतृत्व आहे. समाज प्रबोधन, गायन, वादन, राजकारण अशा अनेक गोष्टीत पारंगत आहेत. त्यांच्या बद्दल किती आणि काय काय वर्णावे…!अशा क्रांतिगीता जी महाबळ.
आजच्याच ज्या दिवशी १८५७ चे युद्ध सुरू झाले, त्याच दिवशी १०१ वर्षानंतर क्रांतिगीताजींचा राष्ट्रभक्त आफळे घरात जन्म झाला. सावरकर हे या घराण्याचे जणू कुलदैवतच. क्रांतिगीताजीं बरोबर बोलत असताना कायम ते जाणवत असतं. संभाषण होताना त्यांना ऐकत रहावेसे वाटते. राष्ट्रद्रोह्यांवर बोलताना त्या जेवढ्या पहाडी आवाजात बोलतात, तेवढ्याच गायन करताना त्यांचा आवाज अगदी कोमल असतो. ज्ञानाचा नुसता भांडार. खूप खूप शिकलोय आजपर्यंत त्यांच्याकडून. उत्तम कीर्तनकार, गायक, लेखक, विचारवंत, शिक्षक. गुरू होय गुरू !  
क्रांतिगीताजींना वाढदिवसाच्या सशस्त्र सहस्त्र लक्ष मंगलमय शुभेच्छा…!त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच आई भवानी चरणी प्रार्थना.!
-हर्षल मिलिंद देवविरार (वसई-पालघर) (अमेरिका)

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *