तळेगाव येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

तळा, रायगड (मनोज शेलार) :- सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील रायगड जिल्ह्यातील तालुका तळेगाव येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव येत्या २३ मार्च रोजी हिंदू तिथीनुसार साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आखण्यात आली आहे.
दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ठीक ७ वाजता शिवज्योत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. खरवली फाटा, उसर खुर्द, भानांगगकोड मार्गे, पाचघर, आनंदवाडी ते तळा या मार्गावरून ही रॅली निघेल. १० वाजता शिवज्योत, शिवपूजन व शिवरायांची आरती होईल. दुपारी ठीक ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक सोहळा सुरू होईल. सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
तसेच शिवव्याख्याते श्री. सचिन कर्डे यांचे “शिवरायांची युद्धनीती” या विषयावर व्याख्यान रात्रौ ठीक ९ वाजता आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम “छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा आणि राष्ट्रभक्ती गीतांचा कार्यक्रम ग्रामस्थ भजन मंडळ तळेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
तळेगाव ग्रामस्थ मंडळींच्या वतीने “शिव साधना” हा विशेष उपक्रम दर सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये गावी दर सोमवारी संध्याकाळी ७ वाजता शिववंदना होते. यावर्षी या उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत आहे. दर सोमवारी नियमीत ग्रामस्थ शिवभक्त आणि रणरागिणी सगळ्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती घेण्यात येते. 
सदर कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ व महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी कठोर परिश्रम घेत आहेत.

ReplyForward
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *