असे आहेत एकदिवसीय सामन्यांतील नवीन नियम १) १५-४० षटकांमधील पावरप्ले आता बंद होणार २) पहिल्या 10 षटकांमध्ये आता कॅचिंग पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवणं अनिवार्य नाही ३) ४१-५० या शेवटच्या दहा षटकांत ४ ऐवजी ५ खेळाडू ३० यार्ड च्या बाहेर राहू शकतात ४) प्रत्येक ‘नो’ चेंडूवर ‘फ़्रि हिट’ मिळणार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने या सुधारित नियमांची शिफारस केली होती. या शिफारशींना अखेर आयसीसीने मान्यता दिली. आता या नवीन नियमांमुळे एकदिवसीय सामन्यात नक्कीच चुरस पाहायला मिळेल.]]>