ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, कोहली, बुमराचं पुनरागमन

निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली.

मुंबई: येत्या २४ तारखेपासून चालू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. न्यूझीलंड दौऱ्यात अराम दिलेल्या गोलंदाजीचा प्रमुख कणा जसप्रीत बुमरासह कर्णधार विराट कोहलीचंही संघात पुनरागमन झाले आहे. निवड समितीने टी-२० संघासाठी, पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी व उरलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची निवड केली आहे. यात धोनीचा बॅकअप म्हणून रिषभ पंतला स्थान मिळाले आहे तर दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला टी-२० सामन्याने रविवारी २४ फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. दोन टी-२० सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका २ मार्चपासून सुरु होईल. पहिला सामना हैदराबाद येथे होईल, त्यानंतर ५ मार्चला नागपूर येथे, रांची (८ मार्च), मोहाली (१० मार्च ) व शेवटचा सामना दिल्ली येथे १३ मार्चला असेल.

टी-२० मालिकेत भारताचा युवा फिरकीपटू कुलदीप यादवला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. त्याच्या जागी मुंबई इंडियन्सचा मयांक मार्कंडेय याला संघात स्थान देण्यात आले आहे. कॉफी विथ करण कार्यक्रमातील वादानंतर  भारतीय संघातून बाहेर फेकलेल्या के. एल. राहुलही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली असून उमेश यादवचा समावेश केला गेला आहे.

टी-२० संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग दोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे

पहिल्या दोन एकदिवसीय सामान्यांसाठी संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल

उरलेल्या तीन सामान्यांसाठी संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, लोकेश राहुल

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *