पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला, ४४ जवानांनी पत्करले हौतात्म्य

स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने हा हल्ला घडवून आणला. जैश ए मोहम्मदचा आदिल अहमद दार उर्फ वकास हल्ल्याचा सूत्रधार.

जम्मू-काश्मीर: २०१६ सालचा उरी हल्ला आजही ताजा असताना आज येथील पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला. भारतीय जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती त्या ठिकाणी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी  एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला.

आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या हल्यात एकूण ४४ जवान शाहिद झाले आहेत. जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. साधारणतः २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या रस्त्यावरून नेत हा स्फोट घडवुन आणला. या ताफ्यात सीआरपीएफच्या तीन बटालियन होत्या. या तीन बटालियनमध्ये जवळपास २५०० हजार सैन्य होते.

सीआरपीएफचे डीजी आर. आर भाटनगर यांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हल्ल्याचा तपास सुरू आहे.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *