हम नही सुधरेंगे… सर्वात वेगवान 'ट्रेन १८' वर चाचणीदरम्यान दगडफेक

नवी दिल्ली: भारतीय उत्क्रांती घडवून आणण्याच्या हेतूने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या जलद ‘ट्रेन १८’ चाचणीदरम्यान दगडफेक करण्यात आली. महत्वाचं म्हणजे येत्या २९ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ता ट्रेनचे उदघाटन होणार आहे. त्यापूर्वीच झालेल्या या दगडफेकीमुळे पुन्हा एकदा देशातील समाजकंटकांचा प्रश्न देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण येत आहे.
दिल्ली ते आग्रादरम्यान रेल्वेची चाचणी घेताना काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केल्याची माहिती जेष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दगडफेकीमुळे रेल्वेच्या काचा फुटल्याने रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरीचे जनरल मॅनेजर सुधांशू मनू यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. ‘ट्रेन-१८’ १८० किमीच्या स्पीडने दिल्ली ते आग्रा येथे धावत होती. रेल्वेने चाचणीसाठी १८१ किमीच्या स्पीडला धावत असताना काही जणांनी रेल्वेवर दगडफेक केली’, असे सुधांशू मनू यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
ट्रेन-१८ ही देशातील पहिली विनाइंजिन रेल्वे असणार आहे. दिल्ली ते वाराणसी यादरम्यान धावणारी हि ट्रेन शताब्दी एक्स्प्रेसची घेणार आहे. या रेल्वेला बनवण्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च केला आहे. १६ डबे असणारी ही ट्रेन संपूर्णपणे वातानुकूलित असणार आहे.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *