रणजी करंडक: मुंबई विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित

मुंबई: ४१ वेळचा रणजी करंडक विजेत्या मुंबईला यंदाच्या मोसमात आपला पहिला विजय मिळवण्यास अजूनही प्रतीक्षा करावीलागणार आहे. येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बडोद्याविरुद्धच्या ‘अ’ गटातील आपलापाचवा साखळी सामना अनिर्णित राखण्यात यश आले. यंदाच्या सत्रातील एकूण पाचपैकी चार सामने अनिर्णित व गुजरातविरुद्ध पराभव स्वीकारावा लागणाऱ्या मुंबईला आपल्या पहिल्या विजयासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

प्रमुख खेळाडूंची उणीव भासलेल्या मुंबईला या सामन्यात श्रेयस अय्यरचे सहकार्य लाभले. अजिंक्य राहणे, पृथ्वी शॉ, रोहितशर्मा हे खेळाडू भारताच्या कसोटी संघाचे हिस्सा असल्याने शिवाय सूर्यकुमार यादव व धवल कुलकर्णी यांसारख्या खेळाडूंचा हरवलेला फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय होता. अश्यातच संघाची चाललेली अवस्था आणखीच चिंतादायक होती.

हार्दिक पंड्याची उपस्थिती लाभलेल्या बडोदा संघाने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते.मुंबईने श्रेयस अय्यर (१७८) व कर्णधार सिद्धेश लाड (१३०) यांच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४६५ धावांचा डोंगर उभारला. हार्दिक पंड्याने बडोदासाठी सर्वाधिक पाच गडी (८१ धावांत) बाद केले. मुंबईच्या ४६५ धावांना उत्तर देण्यास उतरलेल्या बडोदा संघाने ४३६धावा केल्या. पहिल्या डावाची बरोबरी करण्यास आलेला बडोदा संघ २९ धावांनी मागे पडला.बडोदा संघासाठी आदित्य वाघमोडे (११४), विष्णू सोलंकी (१३३), हार्दिक पंड्या (७३) वशिवालिक शर्मा (५१) यांच्या खेळीच्या जोरावर इतपर्यंत मजल मारली. मुंबईसाठी रॉयस्तानडायसने सर्वाधिक चार गडी बाद केले.

पहिल्या डावातील आघाडी नंतर मुंबईने दुसऱ्या डावात सात बाद ३०७ धावा केल्या. या डावात मुंबईसाठी शुभम रांजणे (६४), एकनाथ केरकर (५६)व शिवम दुबे (७६) यांनी अर्धशतके झळकावली. हार्दिक पंड्याने दुसऱ्याडावही दोन गडी बाद करीत आपला अष्टपैलू खेळ प्रदर्शित केला. पहिल्या डावाच्या आघाडीच्याजोरावर मुंबईला तीन तर बडोदाला एक गुण मिळाला. श्रेयस अय्यरच्या पहिल्या डावातील धडाकेबाज शतकाच्या जोरावर सामनावीराचा किताब देण्यात आला.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *