कुछ पाने कि हो आस आस…

शुभम पाटीलच्या कौशल्याचीदखल वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांनीही घेतली आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणजे काय? क्रिकेटच्या व्याख्येनुसार, असा खेळाडू जो फलंदाजी व गोलंदाजीत परिपक्व असावा. थोडक्यात, अष्टपैलू खेळाडूने फलंदाजी व गोलंदाजीत संघाला कोणत्याही क्षणी सावरले पाहिजे. प्रत्येकाच्या गरजेनुसार हि व्याख्या बदलेलही. पण अश्या खेळाडूला कुठल्या प्रवर्गात टाकणार जो दोन्ही हातांनी अगदी कौशल्यपूर्ण गोलंदाजी करू शकतो. फक्त फिरकीच नाही तर वेगवानही.

हैराण झालात ना! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९पुरुषांच्या) तरी अजून अश्या गोलंदाजाचा उदय आतापर्यंत झालाय नाही. पण विविध क्रिकेटमध्ये आतापर्यंत [पाच गोलंदाजांनी अशी गोलंदाजी करण्याची किमया केली आहे. विदर्भाचा अक्षय कर्णेवार, श्रीलंकेचा कमिंडू मेंडिस, बांगलादेशची महिला क्रिकेटर शैला शर्मीन, पाकिस्तानचा यासिर जैन व ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर जेम्मा बार्सबी.

पण यांच्यापेक्षाही काही वेगळीच कला आहे ती चंदगड, कोल्हापूरच्या शुभम पाटीलकडे. २३ वर्षीय शुभम दोन्ही हातांनी चेंडूला पाहिजे तास वळवू शकतो. त्यात आणखी भर म्हणजे तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीची करू शकतो. अशी गोलंदाजी करणारा बहुदा तो जगात एकमेव खेळाडू असावा. फिरकीच्या जोडीला मध्यमगती गोलंदाजी म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही. फलंदाजीमध्ये जसा फलंदाज ‘स्विच हिट’ मारून समोरच्या गोलंदाजाला चकित करून सोडते, तसाच शुभमही आपली आगळ्यावेगळ्या कौशल्याने फलंदाजाला चक्रावून सोडतो. पण त्याच्या या कौशल्याची दाखल साधी स्थानिक पातळीवरही आजवर कोणी घेतली नाही.

भारतात क्रिकेट हा खेळ आता केवळ मोठ्या शहरांपुरताच मर्यादित राहिला नाही. छोट्या-छोट्या शहरांतूनही खेळाडू आपली झाप सोडून जातात. महेंद्र सिंग धोनीसारखा खेळाडू याचं जातिवंत उदाहरण. पण शुभमसाठी मात्र त्याच कौशल्य आजही त्याच्या चंदनगड पुरतंच मर्यादित राहिलं आहे. अंडर-१९ साठी बरेच प्रयत्न केले. बऱ्याच ठिकाणी ट्रायलही दिले. पण हाती केवळ आणि केवळ निराशाच आली. मी दोन्ही हातांनी अगदी सहजरित्या गोलंदाजी करतो हेवारंवार सांगूनही कुठेच साधी गोलंदाजी करण्याची संधीच दिली नाही. २०१४ ते २०१७ या सलग चार वर्षी कोल्हापूर जिल्हा व बेळगांव (कर्नाटक) जिल्हा येथे ट्रायल देण्याचा प्रयत्न केला पण एकदाही नशिबाने साथ दिली. नाही. बेळगावला तर म्हणे तू महाराष्ट्राचा रहिवाशी आहेस हे कारण सांगून अक्षरशः हाकलून लावले.

चंदनगडमध्ये लहानाचा मोठा झालेला शुभम वयाच्या पाचव्या वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. घराची परिस्थिती म्हणावी तशी ठीक नव्हतीच. वडिलांनी कोल्हापुरातील दोन्ही घरे विकल्यानंतर मुक्काम चंदनगडला आला. वडिलांचा व्यवसायही बुडाला आणि त्याच्याच आजीचं आजारपण. परिस्थिती बिकटच होत गेली. आणि अश्या परिस्थिती मुलाने क्रिकेटमध्ये करियर करणे वडिलांना पटत नव्हते. शाळेमध्ये असताना शाळा सुरु व्हायच्या आधी शाळा सुटल्यानंतर फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचं असायचं. २०११ साली दहावीची परीक्षा संपल्यानंर व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

१२विच्या प्रॅक्टिकल परीक्षा व जिल्ह्याच्या ट्रायल्स एकाच दिवशी कडाडल्यामुळे शुभमपुढे मोठा प्रश्न येऊन ठेपला होता. जमा केलेले ४०० रुपये घेऊन पळून जाऊन जिल्हा गाठला आणि ट्रायल्स दिल्या. जेव्हा हि गोष्ट वडिलांना समजावून सांगायचा प्रयत्न केला तेव्हा वडिलांनी जे काही केले ते अगदी न सांगण्यासारखेच आहे. कुठल्याही बापाला आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार असतोच. आपल्या ममुलाने चांगले शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी, घरात हातभार लावावा. हेच शुभमच्या वडिलांना अपेक्षित होते. पण क्रिकेटमध्ये वाहून गेलेल्या शुभमला मात्र हि गोष्ट खटकत होती. मुलाची समजूत काढून वडिलांनी त्याला क्रिकेट व काम दोन्ही करायला मिळणार असं आश्वासन दिलं. खुश झालेल्या शुभमने लगेचच वडिलांच्या ऑफरला होकार दिला आणि त्यानंतर त्याच आयुष्य आणखीच बिकट होत गेलं. ज्या नातेवाईकाकडे शुभमला ठेवण्यात आलं होत, त्या नातेवाईकाने शुभमला त्याच्या घराच्या कामावर तब्बल सहा महिने गवंडी कामावर रुजवलं. आता सगळं संपलं असाच विचार शुभमच्या मनात सारखा येऊन राहायचा.

डिप्लोमाचं शिक्षण बेळगावच्या कॉलेजमध्ये पूर्ण करीत असताना तिथे शुभमने आपल्या गोलंदाजीने सर्वांना चक्रावून सोडले होते. कॉलेजमध्ये क्रिकेटची टीम असल्यामुळे शुभमला काहीसा दिलासा मिळाला होता. रोज ६० किलोमीटरचा प्रवास करूनही क्रिकेट त्याने जिवंत ठेवले होते. कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये प्रयत्न केला असता तू महाराष्ट्राचा रहिवाशी असेल असे कारण देऊन प्रवेश नाकारला. पण हे सगळं घडत असतानाही शुभमला सिग्नेचर क्रिकेट क्लबच्या संदीप मुरारी सरांनी पाठिंबा दिला. तसेच दीपक चौगुले यांनी शुभमला योग्य मार्गदर्शन करून खेळाडूसोबतच एक चांगला माणूसही बनवण्यास मदत केली. ये सर्व घडत असताना शुभमला दोन-चार धमकीचेही फोन आले.

मागच्या वर्षी काही वृत्तपत्रांनी शुभमच्या कौशल्याची दखल घेतली. तसेच संपूर्ण चंदनगड शुभमच्या पाठीशीही होता. दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे रियाज बागवान यांनी फोन करून कोल्हापूरला खेळण्याचा सल्ला दिला.यावेळी बातम्या पाहून स्थानिक क्लब मधून ऑफर मिळाली ज्याचामधे ९०% मुले ही पहिल्यांदाच प्रोफेशनली खेळत होती, अनुभव वाटता येईल यासाठी शुभम तयारही झाला. पण थोड्याच दिवसांनी फिटनेससाठी सर्व करीत असताना फुटबॉल खेळताना गुडघ्याला दुखापत झाली आणि सर्व आशांवर पाणी फिरले.

या वर्षीच्या एप्रिल महिन्यात कोल्हापुर जिल्ह्याच्या डिव्हिजन जवळ आल्या होत्या, दुखापत असताना सुद्धा खेळायचा निर्णय घेतला कारण संघ नवीन आणि त्यात पहिलीच स्पर्धा असल्यामुळे अनुभव थोड़ा असायला पाहिजे होता. ग्रुप स्टेज चा दोन सामन्यानमधे सगळी सूत्रे हाती घेऊन योग्य मार्गदर्शन करून एक विजय व एक सामना बरोबरीत आणला. पण दुखापतीमुळे केवळ एकच षटक टाकता आलं. त्यातही त्याने २ फलंदाजांना माघारी धाडले. दुखापत आणखीच गंभीर होत गेली आणि अखेर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला मुकावं लागलं. परिणाम, अनुभवाच्या अभावी एसपी क्रिकेट अकादमीला पराभवाचा सामना करावा लागला.

कर्नाटक प्रीमियर लीग, तामिळ नाडू प्रीमियर लीग, टी-२० मुंबई लीग यांसारख्या स्थानिक लीगमधून उभारते खेळाडू आज नावारूपाला आले आहेत. जर कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये शुभमला एक संधी दिली गेली असती तर नक्कीच त्याचं सोनं त्याने केलं असतं. केवळ तो दुसऱ्या राज्यातील रहिवाशी असल्याने त्याला नाकारण्यात आलं.

शुभमचे बरेचशे मित्र आज वेगवेगळ्या स्थरावर आपले नाव कोरत आहेत. नथू सिंग (आयपीएल राजस्थान रॉयल्स), रिषभ पंत (भारतचा यष्टीरक्षक), शुभम नायक (भारत अंडर-१९) हे सर्व खेळाडू शुभमच्या वयाचे. आज ते एका वेगळ्याच स्थरावर जाऊन पोचले आहेत. पण शुभम मात्र आजही आशेवर आहे कि त्यालाही एक संधी मिळेल आणि त्याचं सोनं करेल. श्रीलंकेचा अंडर-१९ संघाचा कर्णधार कर्णधार चरिथ असलंका याने शुभमचे व्हिडीओ इंटरनेटवर पाहून प्रशंसाही केली. शिवाय वेस्ट इंडिजचे एके काळाचे धडाकेबाज फजंदाज सर विवियन रिचर्ड्स यांनीही शुभमचे कौशल्य पाहून वाहवाह केली.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *