मुंबई: दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ रोजी काही मोजक्याच हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीमध्ये अमर हुतात्मा पंडित नथुरामजी गोडसे यांच्या ६९ व्या आत्मार्पण दिनानिमित्त हिंदु महासभा प्रदेश कार्यालय दादर मुंबई येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. १९ मे १९१० ह्या दिवशी एक प्रखर देशाभिमानी व धर्माभिमानीने राष्ट्रसेवेसाठी जन्म घेतला होता. असे म्हणून त्यांच्या जीवन कार्यातील काही रोमांचक कृतीअनुभव थोर प्रवचनकार तथा कीर्तनकार क्रांती गीता महाबळ यांनी सांगितले. राष्ट्रीय संघठन मंत्री श्री. दिनेशजी भोगले यांनी आपल्या दिर्घ व्याख्यानात पंडित नथुराम गोडसे यांच्या महत्कार्याचे अनेक कौतुकोवर्णने सांगितले. ते पुढे म्हणाले की, नथुराम गोडसे यांचे एक विशेष असे आहे की, ते ऐकमेव क्रांतिकारी हुतात्मा ठरले ज्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अखंड राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रापेक्षा महान बनलेल्या अपराध्यास वध करून देशभक्ती दाखवली. पण आपल्याच तत्कालीन पाखंडी सरकारकरडून त्यांचा जवाब सार्वजनिक न करताच त्यांना फाशी देण्यात आली. श्री. उमेश केळुसकर यांनी गोडसे यांच्या इच्छापत्राचे वाचन करून, त्यांच्या अस्थिचे पवित्र सिंधूनदीत विसर्जित करण्याचे आशावाद व्यक्त केलं. या प्रसंगी ज्येष्ठ गायक तथा सावरकर विचारवंत मा. श्री सतिश भिडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजक श्री. पांडूरंग पवार, केंद्रीय संघठन मंत्री श्री दिनेशजी भोगले, श्रीमती क्रांती गीता महाबळ, महासभा प्रदेश सहसंघटक श्री. अरूण माळी, मा. श्री सतिश भिडे, मा. श्री केदार सोमण, मा. श्री. संजय राणे, मा. श्री. प्रसाद केरकर यांच्या सोबत श्री. उमेश केळुसकर, कु. प्रविण गर्जे, श्री मांडवकर, धारावीचे श्री. रमेश कराळे आदी सावरकर प्रेमी मंडळी उपस्थित होते. वंदे मातरम! जय हिंदुराष्ट्र! स्वातंत्र्यवीर सावरकर की जय! अखंड हिन्दूराष्ट्र करके रहेंगे! अंबालासे आयी आवाज..! नथुराम गोडसे जिंदाबाद.!! अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. गोडसेजींच्या ६९ वी आत्मार्पण दिवस निमित्ताने ह्या पराक्रमी महापुरुषास विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा.]]>