औरंगाबाद (रुपेश बंगाळे): स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वरील सातत्याने होणाऱ्या खोट्या आरोपांच्या निषेधार्थ औरंगाबाद मधील तरुणांनी एकत्र येत शनिवारी रात्री निषेध नोंदवला. या वेळी विविध क्षेत्रातील सावरकर प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पुजण करून कार्यक्रमास सुरवात केली. भाऊ सुरडकर यांनी प्रस्तविक केले. त्यात त्यांनी सावरकरांवर होणाऱ्या आरोपाबद्दल निषेध नोंदवला व आरोपीस तातडीने अटक व्हावी अशी मागणी केली. तसेच सावरकरांवर होणाऱ्या आरोपाचे खंडन युवा पार्थ बावसकर यांनी केले. उपस्थित सावरकर प्रेमींनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देखील दिल्या. निषेध नोंदवण्यासाठी माधुरी ताई आधवंत, ऋषिकेश भालेराव, अनिल दादा पैठणकर, अमित कुलकर्णी, प्रल्हाद देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, कृष्णा निंबरकर, संकेत कुलकर्णी, कुणाल वैध, अभिषेक कादि, सचिन वाडे पाटील, गौरव भालेराव, आशुतोष देशपांडे, सचिन जोशी, गौरव सुदामे, पंकज पाठक, मोदी काका, अमित केसाळे, प्रशांत चिटणीस, निखिल पांचाळ आदी सिडको बस स्थनक समोरील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्या समोरील जागेत झाला.]]>