बोनस म्हणजे काय ?

कामगार जगतात मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती. जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्याप्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात ५२ आठड्यांचा पगार मिळत होता. ४ आठवड्यांचा एक महीना धरला असता, वर्षामध्ये १३ पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात. ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा १४ पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातून तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायचा नियम भारतात लागू झाला.

अत्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थव्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे. ३० जून १९४० साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाला होता. हे महत्व कित्येकाना माहिती नाही. म्हणूनच ते बोनस म्हणजे बक्षीस समजून दिल तेवढे पैसे घेतात. मित्रांनो, हे आपले हक्काचे पैसे आहेत. उपकार समजून घेऊ नका. ही माहिती आज आपणास या द्वारे देत आहे.
संकलन:- भालचंद्र कासले, नवी मुंबईज
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *