दिल्ली:- नुकतीच अखिल भारत हिंदु महासभा दिल्ली प्रदेशच्या वतीने दिल्ली येथे श्रीराम मंदिर प्रश्नी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये हिंदू महासभा दिल्ली प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनकर यांनी अनेक साधुसंताच्या उपस्थितीमध्ये श्रीराम मंदिर मुद्यावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी विजय सोनकर म्हणाले की, आयोध्येत श्रीराम मंदिर तर आम्ही बनविणारच. केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंची दिशाभूल करून प्रभू श्रीराम मंदिराचे राजकारण करून सत्ता मिळविली. मात्र श्रीराम मंदिराच्या नावाने सत्तेमध्ये आलेल्या भाजपने मंदिर उभारणीसाठी कोणतेही ठोस पाऊल गांभीर्याने उचलले नाही आणि त्यासाठी विशेष नवीन कायदा देखील बनविला नाही. त्यामुळे आज सर्व साधू संत भाजपच्या विरोधात आहेत. प्रभू श्रीराम यांच्या मनात आले तर सर्व हिंदू मिळून डिसेंबर पर्यंत यातून नक्कीच मार्ग काढतील.
विजय सोनकर पुढे म्हणाले की, आता यापुढे कुणालाही श्रीराम मंदिराच्या नावाने राजकारण करू देणार नाही. हिंदूंच्या भावनांशी खेळ करू दिला जाणार नाही. “सौगंध रामजी की खाते हैं, हम मंदिर वही बानायेंगे, बोलो जय श्रीराम” असा जयघोष करीत उपस्थित साधू संतांनी विजय सोनकर यांना हसतमुखाने आशीर्वाद दिला.