मुंबई:- सर्वत्र दिपावली निमित्त रोषणाई केलेली असताना ज्या सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर वास्तव्यास होते व तिथेच त्यांनी आत्मार्पण केले अशी पवित्र वास्तू अंधारमय असणे हे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. पण जिथे सावरकर भक्त आहेत तिथे असे होऊच शकत नाही. आज राष्ट्राभिमानी समितीने सावरकर सदनात कंदील लावून, फुलांचे तोरण लावून, तुळशीचे वृंदावन सजवून , पणत्या पेटवून संपूर्ण सदनाचा परिसर तेजोमय करून टाकला. आपल्या तात्यांना त्यांनी मानवंदना दिली. एक दिवा आपल्या सैनिकांच्या उदंड आयुष्यासाठी हा समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ह्या पवित्र वास्तूमध्ये पेटवला. त्यानंतर दीपावलीचा शुभ मुहूर्त हा प्रत्येकाने फुलबाजा पेटवून आनंदात साजरा केला. त्यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार आदरणीय क्रांतिगीता ताई महाबळ ,समितीचे मार्गदर्शक श्री विलास फडके, अध्यक्ष प्रशांत पळ, सरचिटणीस श्री मनोज मिसाळ, म.अध्यक्षा वनिता चेटियार, किरण पळ,रुपेश शिगवण, दिलीप शिरसाट, शंकर भोमिक,सौ शिरसाट उपस्थित होते. सर्वांनी त्यानंतर सावरकर यांच्या स्नुषा आदरणीय सुंदर वहिनी यांचे आशीर्वाद घेतले.]]>