झुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर ‘क्रांतीवीर वसंतबाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कारा’ने सन्मान !

पंढरपूर:-  हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असलेले, हिंदुहितासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांना भक्कम कायदेशीर साहाय्य करणारे झुंजार अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांना यंदाचा ‘क्रांतीवीर वसंतबाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ घोषित झाला आहे. श्री विठ्ठल मंदिरासमोरील रुक्मिणी पटांगणात २१ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. अनिल पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

     मालेगाव बॉम्बस्फोट आणि मडगाव स्फोट प्रकरणांत अडकवण्यात आलेल्या निरपराध हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सुटकेमध्ये अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सिंहाचा वाटा होता. केवळ अधिवक्ता म्हणून नाही, तर वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये हिंदुत्वाची बाजू परखडपणे मांडणारे, भगव्या आतंकवादाचा बुरखा फाडणारे, तसेच कोणतीही भीड न ठेवता राजकारणांच्या चुकांचे आणि हिंदुविरोधी भूमिकांचे वस्त्रहरण करणारे निर्भीड वक्ते म्हणूनही अधिवक्ता संजीव पुनाळेकर सुप्रसिद्ध आहेत.
साभार:- सनातन प्रभात
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *