पुणे: विंडीजबरोबर चालू असलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर ४ नोव्हेंबर पासून होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेतून भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला डावलण्यात आले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतूनही धोनीला डच्चू देण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २६ ऑक्टोबर) रात्री उशिरा झालेल्या भारतीय निवड समितीच्या पत्रकार परिषदेत दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आणि धोनीच्या फॅन्ससह सर्वच भारतीय फॅन्सना एक धक्का बसला. भारताला २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्र सिंग धोनीला टी-२० संघातून डावळण्याची हि पहिलीच वेळ असावी. निवड समितेचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद व सचिव अमिताभ चौधरी यांनी संयुक्य घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली. विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी विराट कोहलीला आराम देण्यात आला असून संघाची धुरा आशिया चषक विजेत्या रोहित शर्मावर देण्यात आली आहे. रात्री उशिरा १० वाजून ४५ मिनिटांनी झालेल्या या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघाचीही घोषणा करण्यात आली. कसोटी संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून शिखर धवनला मात्र वगळण्यात आलं आहे. रोहित शर्मासह मुरली विजयलाही संघामध्ये निवडलं गेलं आहे. यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत निवडकर्त्यांची पहिली पसंद राहिला असून पार्थिव पटेलला दुसरा यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आले आहे. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा टी-२० संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, शादाब नदीम]]>