ठाणे : – वागळे इस्टेट परिसरामध्ये दिवसा ढवळ्या भर रस्त्यामध्ये प्रियंका जगताप या २४ वर्षीय मुलीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना ठाण्यामध्ये घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. प्रेम प्रकरणातून सदर प्रकार घडल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून पोलिसांनी घटना स्थळी येऊन ताबडतोब तपासास सुरुवात केली आहे. विओ – २८ एप्रिल रोजी प्रियंका जगताप या २४ वर्षीय मुलीचे लग्न झाले होते. ती ठाण्यातील किसन नगर परिसरामध्ये राहत होती. व ज्ञानसाधना कॉलेज मध्ये शिकत होती. तिची परीक्षा सुरू असल्यामुळे ती तिच्या माहेरी आली होती. आज दुपारी २.३० च्या सुमारास ती परीक्षा देऊन कॉलेज वरुन घरी येत असताना वागळे इस्टेट येथील पासपोर्ट ऑफिसच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्यावरून जात असताना तिच्यावर एका अज्ञात तरूणाने धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला . प्रेम संबंधामधून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी येऊन तपासास सुरुवात केली. श्वान पथकास पाचारण करून धागेदोरे मिळवण्यास सुरुवात केली. तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ही ताब्यात घेण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांना संशयित आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. व्हीजुयल्स आणि बाइट एफटीपी ने पाठवीत आहे . बाइट – विलास चंदनशीवे , पोलिस उपायुक्त. फाइल नेम १) (ठाणे ०६.०५.२०१५ ठाणे मर्डर स्टोरी ) २ ) (ठाणे ०६.०५. १५ ठाणे मर्डर स्टोरी ) सुहास शिंदे (ठाणे ) 09323461838 / 08691808388]]>