रोहित शर्माची कप्तानी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर आठ गडी व १२६ चेंडू राखत विजय मिळवला. दुबई: कालचा हॉंगकॉंग विरुद्धचा अटीतटीचा विजय ताजा असताना भारत व पाकिस्तान या उभय संघांत तगडी स्पर्धा पाहावयास मिळेल असे वाटत असताना रोहित शर्माच्या भारतीय संघाने पारंपरिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानला चारीमुंड्या चित करीत आशिया कप २०१८ च्या साखळी सामन्यात आठ गडी व तब्बल १२६ चेंडू राखत विजय मिळवला. चेंडू राखत विजय मिळवण्याच्या बाबतीत भारताचा ही सर्वात मोठी जीत ठरली. भारताच्या आजच्या विजयात गोलंदाजी, फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही बाजूंचा मोलाचा वाटा लाभला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पहिली असता पाकिस्तान पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले असताना भुवनेश्वर कुमारने इमाम-उल-हकला (२ धावा) तिसऱ्याच षटकात बाद करीत पाकिस्तानला पहिला हादरा दिला. पाचव्या षटकात लगेचच दुसरा सलामीवीर फखर झमानला भोपळाही फोडू देता पाकिस्तानची अवस्था दोन बाद तीन अशी केली. पाकिस्तानला या धक्क्यातून सावरले ते शोएब मलिक व बाबर आझम या जोडीने. तिसऱ्या गड्यासाठी १०३ चेंडूंत ८२ धावांची मैल्यवान भागीदारी रचित डावाला आकार देण्याचा प्रयत्न या जोडीने केला. पहिल्या दोन धक्क्यांनंतर या जोडीने सावध पवित्रा घेत भारताच्या वेगवान गोलंदाजांचा अगदी योग्यतेने पाहुणचार करीत धावफलक सरता ठेवला. मधेच मिळणाऱ्या खराब चेंडूंचा समाचार घेत पहिल्या पावरप्लेमध्ये कमी झालेली धावगती वाढवण्यावर भर दिला. पाकिस्तान २५० धावांचा पल्ला गाठेल असे वाटत असताना २२ व्या षटकात कुलदीप यादवच्या फिरकीसमोर बाबर आझम (४७) किल्न बोल्ड होत पाकिस्तानच्या धावांवर ब्रेक लागला. २१ चेंडूच्या अंतरावर लगेचच कर्णधार सर्फराज अहमदचा (६) झेल मनीष पांडेने लॉन्ग-ऑनला धावत येत अप्रतिमरीत्या पकडीत पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. २७ व्या षटकाच्या अंतिम चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या नादात रायडूने पॉईंट वरून नॉन-स्ट्रायकरकडील यष्टीचा अचूक वेध घेत शोएब मालिकेला तंबूत धाडीत पाकिस्तानचा निम्मा संघ बाद केला. उरलेल्या फलंदाजांना केदार जाधव व बुमराने बॅड करीत पाकिस्तानला १६२ धावांवर गारद केले. आजच्या सामन्यातील आणखी एक वैशिष्टये ठरले ते रोहित शर्माचा पाकिस्तानविरुद्धच्या फॉर्म. एरव्ही पाकिस्तानविरुद्ध डगमगणारा रोहित आज मात्र आपल्या विशेष शैलीत फलंदाजी करताना दिसला. मोहम्मद आमिरची गोलंदाजीसमोर हतबल होताना दिसणारा रोहित आज वेगळ्याच मूडमध्ये होता. तर उस्मान खानच्या गेलाच षटकात दोन षटकार व एक चौकार ठोकत आपण पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजणांना चांगल्या रीतीने सामोरे जाऊ शकतो हे दाखवून दिले. रोहितने ३९ चेंडूंचा सामना करीत सहा चौकार व तीन षटकार ठोकत ५२ धावा कुटल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे हे ३५ वे अर्धशतक ठरले. तर त्याच्या सलामीचा पार्टनर शिखर धवनने ५४ चेंडूंत ४६ धावा केल्या. रोहित व धवन बाद झाल्यानंतर उरलेली कसर अंबाती रायडू व दिनेश कार्तिक यांनी पूर्ण केली. दोघांनी प्रत्येकी ३१ धावांचा योगदान देत भारताला १६३ धावांचा पल्ला २९ व्या षटकातच पार करून दिला. भुवनेश्वरच्या सात षटकांतील १५ धावांवर तीन गडी बाद कामगिरीसाठी सामानावीराचा ‘किताब देण्यात आला.]]>