नवी दिल्ली: अखिल भारत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी हैदराबादचे महामंडलेश्वर श्री श्री श्री रामानुज व्रतधर जियर त्रिदण्डी महाराज यांची निवड करण्यात आली. ते १ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित हिंदू महासभेच्या ६४ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अध्यक्षपद भूषवितील व २०१८ ते २०२० पर्यंत पक्षाच्या अध्यक्ष पदाचे दायित्व स्विकारतील, अशी माहिती हिंदू महासभा स्वागत समितीचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी मतमोजणी समाप्त झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना दिली. रवींद्र द्विवेदी यांनी पुढे म्हटले की, माजी सत्र व जिल्हा न्यायाधीश श्री. जे. सी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ५ सदस्यीय समितीने निर्धारित वेळेच्या अर्धा तास उशिराने २० राज्यांच्या उपलब्ध झालेल्या मतांच्या मतमोजणीस सुरुवात केली. २० राज्यांपैकी १५ राज्यांनी स्वामी त्रिदण्डी महाराज यांच्या बाजूने मतदान केले. दुसऱ्या क्रमांकावर ३ राज्यांचे मतदान लाभलेल्या कोलकाता येथील सुश्री राज्यश्री चौधरी होत्या, तर इतर २ उमेदवार महाराष्ट्राचे प्रमोद पंडित जोशी आणि मध्य प्रदेश येथील स्वामी सिद्धागिरी जी महाराज यांना प्रत्येकी १/१ राज्यांचे मत मिळाले. सायंकाळी ठीक ७:३० वाजता मतमोजणी समितीचे अध्यक्ष माजी न्यायाधीश जे. सी. शर्मा यांनी निवडणूक निकालावर हस्ताक्षर केली. मतमोजणी समितीचे सदस्य सर्वश्री देवेंद्र पाण्डेय, अधिवक्ता संजय शर्मा, दिनेश कुमार, राज किशोर द्विवेदी तसेच अनुप केनी यांच्या स्वाक्षरी नंतर निवडणुकीचे निकालपत्र स्वागत समितीकडे सुपूर्द करण्यात आले. त्या नंतर स्वागत समितीचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांनी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वामी त्रिदण्डी महाराज यांच्या नावाची जाहीर घोषणा केली. घोषणा करताना श्री. रवींद्र द्विवेदी यांनी इतर तिन्ही पराजित उमेदवारांना पराजयाची भावना त्याग करून नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी त्रिदण्डी महाराज यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारी समिती मध्ये सामील होऊन हिंदू महासभेस अखंड प्रचंड बनविण्याचे आवाहन केले. स्वामी त्रिदण्डी महाराज यांच्या नावाची हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याची जाहीर घोषणा होताच उपस्थित नेत्यांनी “जय हिंदुराष्ट्र, जय श्रीराम तसेच वीर सावरकर अमर रहे” अशा गगनभेदी घोषणांच्या वर्षावामध्ये नवनियुक्त अध्यक्षांचे पुष्पहार घालून भव्य स्वागत करण्यात आले. त्यांना मिठाई भरवून हिंदुत्वाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हिंदू महासभेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी त्रिदण्डी महाराज हे आपल्या करणारी भाषणात म्हणाले की, “हिंदू समाज आणि हिंदुत्व रक्षण, हिंदू विरोधी शक्तींना त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर देणे, जातीवर आधारित आरक्षणा ऐवजी गरिबी रेषेच्या खाली असणाऱ्या भारतीय नागरिकांना आर्थिक निकषावर आधारित संरक्षण देणे, अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे मंदिर निर्माण करणे, तसेच काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेला मशिदीच्या लागलेल्या कलंकापासून मुक्त करणे, राष्ट्र रक्षा, गो रक्षा आणि धर्म रक्षा यांना प्राधान्य देण्यात येईल. ते पुढे असेही म्हणाले की, लवकरात लवकर हिंदू महासभेची नवीन कार्यकारीणी स्थापन करून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी केंद्रीय उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष दिनेश भोगले, निवर्तमान राष्ट्रीय प्रवक्ते स्वामी ज्ञान आनंद स्वामी जी महाराज, उत्तर प्रदेशचे अध्यक्ष पियुष्कांत वर्मा, प्रभारी मनीष अग्रवाल, नीवर्तमान उपाध्यक्ष पी. सी. शर्मा तसेच प्रमुख नेते उपस्थित होते.]]>