रोहा येथे हिंदू महासभेची स्थापना

रोहा: नुकतीच रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारत हिंदु महासभा या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रणित पक्षाच्या रोहा तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती हिंदू महासभेचे विक्रांत भाऊ अलगुजे हे आवर्जून उपस्थित होते. आज हिंदू महासभेची देशाला का गरज आहे, तसेच इतर राजकीय पक्ष स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जातीयवादाचा कशाप्रकारे लाभ घेत आहेत हे सांगत असतानाच, सावरकरांनी स्वतःच्या कुटुंबावर कशाप्रकारे तुळशीपत्र ठेवून राष्ट्रहितासाठी स्वतःचे आयुष्य अर्पण केले हे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले. तसेच हिंदुत्वाचे कार्य घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले. अखिल भारत हिंदु महासभेच्या रोहा तालुका कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र प्रदेश सह संघटक तथा रायगड जिल्हा अध्यक्ष अरुण माळी यांनी अतोनात मेहनत घेतली. त्यासाठी त्यांना रोह्याचे तरुण तडफदार कार्यकर्ते परेश सीलिमकर, गणेश पवार, राजेंद्र जाधव, मधुकर खामकर, संदीप गानेकर इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले. जिल्हा अध्यक्ष अरुण माळी यांनी हिंदू महासभा पक्षाच्या स्थापनेचा इतिहास व हिंदू महासभा पक्षाची स्थापना का करण्यात आली या विषयी माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. तसेच सावरकरांवर विरोधकांच्या माध्यमातून जे आरोप करण्यात येतात त्याचा खरपूस समाचार घेतला. येत्या काळात हिंदू महासभा महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरांत पोहचवू या असे कळकळीचे जाहीर आवाहन केले. या कार्यक्रम प्रसंगी हिंदू महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर खामकर, जिल्हा सहकार्यवाह संदीप गाणेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत सुतार यांनी देखील उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. नवनियुक्त तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची नावे रायगड जिल्हा अध्यक्ष अरुण माळी यांनी घोषित केली. रोहा तालुका कार्यकारिणी खालील प्रमाणे:- गणेश पवार (अध्यक्ष), परेश सिलिमकार (कार्यवाह), सुनील पोळेकर (उपाध्यक्ष), संतोष निकम (संघटक), राजेंद्र जाधव (कोषाध्यक्ष), मारुती सटवाजी धोत्रे (सह संघटक). सदस्यपदी सर्वश्री महेश अडगळे, वैभव शेडगे, रोशन म्हात्रे (नागोठणे), चंद्रकांत नामदार, उत्तम गोरीले, प्रभाकर रटाटे, सुरेश भोसले, जनार्दन भोई यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात हिंदू ध्वजगिताने करण्यात आली व वंदेमातरम या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन श्री. गणेश पवार यांनी केले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *