दॅट्स द वे – माही वे

केवळ भारताचाच नव्हे तर जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक अशी कीर्ती मिळवणाऱ्या भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आज आपल्या वयाची ३७ वर्षे पार करून ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

आज भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंगचा वाढदिवस. योगायोग म्हणा किंवा भाग्य. माझाही आजच वाढदिवस. भारतीयांचा लाडका कर्णधार म्हणून ‘कॅप्टन मुलं अशी ख्याती असलेला धोनी आज आपल्या वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण करतोय. पण आजची त्याचा असलेला फिटनेस एखाद्या नवख्या तरुण खेळाडूही लाजवेल. २००४ साली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने भारतीय क्रिकेटला आजवर बरेच काही मिळवून दिले आहे. आणि त्याची ख्याती केवळ भारतातच नाही जात साऱ्या जगभरात प्रसिद्ध आहे.

धोनीविषयी आजवर बरेच काही लिहिले आहे. बऱ्याच लेखकांनी भरभरून लिहिले आहे. तर २०१६ साली आलेला त्याच्या जीवनावर आधारित ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या जीवनातील संघर्ष, अनुभव आपण साऱ्यांनी पहिले. पण याच धोनीच्या आयुष्यात आणखी बऱ्याच खडतर गोष्टीही आल्यात.

कोणत्याही खेळाडूच्या कारकिर्दीत दुखापतीचं नातं हे अगदी विचित्र असतं. प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाच्या कारकिर्दीत दुखापतीपासून वाचण्यासाठी अगदी जीवाचं रान करत असतो. मग तो सचिन तेंडुलकर असो वा विराट कोहली. प्रत्येक खेळाडू अश्या परिस्थितून जातो कि त्याला दुखापतीपासून कोणीच वाचवू शकत नाही. धीनीही याला अपवाद ठरला नाही.

२०१७ सालची गोष्ट आहे. पुण्याच्या एम. सी. स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना होणार होता. आदल्या दिवशी होणाऱ्या सरावास उपलब्ध होण्याची संधी मला मिळाली होती. त्या वेळेस मुंबईहून मी काहीसा लवकरच स्टेडिअमवर पोचलो होतो. आणि माझ्या लवकर पोचण्याने पहिल्यांदांच धोनीबरोबर हस्तांदोलन करण्याची संधी मला मिळाली.

सतत विकेट किपींग ग्लोव्ह्‌जमध्ये असणारे हात व फलंदाजीसाठी व्यस्त असणारे हात प्रत्यक्षात मी पहिले. त्याचे ते सतत बिझी असणारे हात जरी वरून सुंदर व स्वच्छ दिसत असले तरी त्यामागच्या वेदना त्यावेळेस मला ते हस्तांदोलन करताना जाणवत होत्या. विकेट किपींग करताना दोन्ही हातांवर सतत चेंडू आदळत बोटं अक्षरशः वाकडी झालेली आहेत. आपण एखादा चेंडू एखाद्या खेळाडूने सोडला तर पोट भरून शिव्या देतो, पण त्यामागच्या वेदना कधीच जाणून घेत नाही. आणि धोनीसारख्या खेळाडूला तर अश्या विचित्र परिस्थितीतून बऱ्याच वेळा जावे लागले आहे.

धोनीनं काहीसा योग्य असा निर्णय घेत २०१४ साली कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. कोणताही गाजावाजा न करता कसोटी क्रिकेटला अलविदा करीत धोनीने आपली कारकीर्द पुढे चालविण्याचा निर्णय घेतला. जर क्रिकेटमध्ये टिकायचं असेल तर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्याशिवाय धोनीकडे पर्याय नव्हता. कारण जर तुम्ही युवराज सिंग म्हणा किंवा झहीर खान म्हणा, या भारतासाठी प्रभावी ठरलेल्या खेळाडूंनाही दुखापतीमुळे आपल्या कारकिर्दीला बायबाय करावं लागलं.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर त्याची कारकीर्द काहीशी अडखळतच सुरुवात झाली. सुरुवातीचे सामन्यांत त्याची झालेली निराश कामगिरी आणि त्यातूनही मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत भारतासाठी यशस्वी कर्णधार म्हणून नावारूपाला आलेल्या धोनीने आजवर बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्या आहेत. आणि आपणही त्याच्या चित्रपटाद्वारे या गोष्टी पहिल्या आहेत. भारतासाठी टी-२० चा विश्वचषक, ५० षटकांच्या विश्वचषक, कसोटीत पहिल्या क्रमांकावर झेप तर २०१३ सालाची चॅम्पियन्स ट्रॉफी असे बरेच पराक्रम धोनीने केले आहेत. शिवाय ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन सीबी सिरीज जिंकत एक उत्तम कर्णधारच नाही तर एक उत्तम फिनिशरही आहोत हे दाखवून दिलं.

आज धोनी जरी भारतीय संघाचा कर्णधार नसला तरी भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार विराट कोहली मैदानात कोणताही निर्णय घेताना धोनीचा सल्ला जरूर घेतो. मग तो फिल्डिंग करताना असो व रिव्हू घेताना असो. धोनीचा अचूक निर्णय आजही भारतीयांना हवाहवासा वाटतो.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *