मागच्या आठवड्यात स्कॉटलंडने केलेला इंग्लंडच्या पराभवामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा चालू झाली ती पुढील वर्षी होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत असलेल्या १० संघांच्या समावेशाचा. सध्या जगभरात फुटबॉल विश्वचषकाचा फिवर चालू आहे. रंगतदार होणारे सामने, अनपेक्षित निकाल, फॅन्समध्ये होणारी तारांबळ आणि बरेच काही मागच्या १०-१२ दिवसांपासून पाहायला मिळतेय. अश्यातच क्रिकेटवेड्या चाहत्यांकडून व क्रिकेट पंडितांकडून प्रश्न येतो तो कि जर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ३२ संघ खेळवले जातात तर मग क्रिकेटमध्ये केवळ १० संघच का? क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने एका खाजगी कार्यक्रमात आयसीसीच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. क्रिकेट खेळाला जर ग्लोबलाईस करायचा असेल तर विश्वचषकसारख्या स्पर्धेत जास्तीत जात संघ खेळवणे आवश्यक आहे. २०१५ विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या तेंडुलकरने असेही म्हटले होते कि जर मोठ्या संघांच्या ‘अ’ संघांनी छोट्या संघांचा दौरा केला तर त्याच्या फायदा अश्या संघांना नक्कीच मिळेल. केवळ विश्वचषक स्पर्धेपुरता मर्यादित न राहता असे संघ आपला खेळ उंचावू शकतात आणि याचा फायदा नक्कीच क्रिकेटच्या प्रसाराला होईल. सुनील गावस्करांचं मत याच्या अगदी उलट आहे. त्यांच्या मते जर आयर्लंड, स्कॉटलंड सारखे संघ विश्वचषक पात्रता फेरी पार करू शकत नसतील तर मग त्यांना विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. थोडक्यात, गावस्कर १० देशांच्या विश्वचषक आयोजनाचे समर्थक आहेत. मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या कॉलममध्ये त्यांनी म्हटले होते कि, एका विजयाने बऱ्याच क्रिकेट पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण तेच लोक हे विसरतात कि पात्रता फेरीसाठी असोसिएट देशांच्या जोडीला तळाचे दोन कसोटी संघही खेळले होते. आणि त्यापैकी एका कसोटी संघालाही स्पर्धेपासून मुकावे लागणार आहे. क्रिकेटच्या या दोन महान खेळाडूंकडून असे वेगवेगळे मत ऐकायला मिळाल्यानंतर मोठा प्रश्न उद्भवतो तो आयसीसीचा हा निर्णय खरंच योग्य आहे का? आता थोडंसं मागे जाऊन वळूया. २००७ सालाचा विश्वचषक जर आठवत असेल तर सर्वात ‘बोरिंग’ विश्वचषक म्हणून ओळखलं जातं. आयसीसीने ५० षटकांच्या विश्वचषकात प्रथमच १६ संघांचा समावेश केला होता. फुटबॉल विश्वचषकाच्या धर्तीवर चार गटांमध्ये प्रत्येकी चार-चार संघ विभागले होते. पहिल्याच फेरीत भारत, पाकिस्तान यांसारखे मात्तबगार संघ बाद झाल्याने स्पर्धेची रंगातच गेली. सुपर ८ सामान्यांच्या लढतीत हातापायाच्या बोटांवर मोजण्याइतकेच प्रेक्षक असायचे. अश्या वेळेस आयसीसीला मोठी समस्या उदभवली होती ती पुढच्या स्पर्धांची. जर प्रेक्षक वर्ग असाच पाठ फिरवत राहिला तर आणखी स्पर्धा आयोजित करायच्या त्या कश्या? शिवाय मोठ्या स्पर्धांतून पैसे कमवायचे कसे? त्या विश्वचषकापासून आयसीसीने पुढचे विश्वचषक स्पर्धांत केवळ १० संघ असतील अशी घोषणा केली. परंतु काही करणास्तव २०११ व २०१५ सालाच्या स्पर्धेत १४ संघ खेळवले गेले आणि २०१९ व २०२३ साली १० संघांवर आयसीसी ठाम राहिली. कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करायची झाली तर सर्वात मोठा ‘एक्स-फॅक्टर’ येतो तो म्हणजे पैसा. आणि हा पैसा अवलंबून असतो तो प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावरून. प्रेक्षकवरच ठरवत असतो तो मोठ-मोठे प्रायोजक. अश्याच स्पर्धांतून मोठ्यामोठ्या ब्रॅण्ड्सना त्यांचा प्रसार करता येतो. २००७ सालाच्या स्पर्धेस मिळाल्या प्रतिसादावरून आयसीसीला भीती वाटली ती प्रयोजकांची. आणि मग याच हेतूने त्यांनी १० देशांचा विश्वचषक स्पर्धेचा निर्णय पक्का केला. आता थोडंसं फुटबॉलकडे वळूया. फुटबॉल खेळाचा विचार केला तर केवळ दोन तासात एक सामना सहज पूर्ण होतो. पण तेच ५० षटकांचा सामना खेळावयाचा झाला तर अख्खा दिवस घालवावा लागतो. शिवाय, फुटबॉल हा खेळ खूप-खूप आधीपासून बऱ्याच देशांत खेळाला जात असल्यामुळे त्याचा प्रचार अगोदरच मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तसेच, फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय सामनेही त्यामानाने कमी खेळले जातात. क्रिकेटविषयी बोलायचं झालं तर ५० षटकांच्या सामन्यास तळागाळाच्या संघांचा पाहिजे तसं प्रदर्शन आजवर पाहावयास मिळालेलं नाही. २००७ विश्वचषकाचाच विचार केला तर ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघाने दुबळ्या नेदरलँड व स्कॉटलंड संघांना अक्षरशः धुतले होते. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडचा २०३ धावांनी तर नेदरलँडचा २२९ धावांनी धुव्वा उडवला होता. तेच दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडला २२१ धावांनी पराभूत केले होते तर स्कॉटलँडला ७ गड्यांनी मात दिली होती. जर अशेच निकाल लागत राहिले तर दर चार वर्षांनी खेळलेल्या जाणाऱ्या विश्वचषकासारख्या स्पर्धेची रंगात वाढणार ती कशी? असो. टी-२० च्या झटपट क्रिकेटमध्ये जास्तीत संघांना स्थान देऊन नक्कीच क्रिकेटचा प्रसार करता येईल. आणि त्याची सुरुवात कि काय, आयसीसीने सर्व सदस्य देशांना टी-२० आंतरराष्ट्रीय सामान्यांचा दर्जा बहाल केला आहे. पण ५० षटकांच्या सामान्यांसाठी नक्कीच छोट्या संघांना बराच घाम गाळण्याची गरज आहे. अफगाणिस्तान व आयर्लंड यांसारख्या संघांना कसोटीच्या मान्यता दिल्यानंतर मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळताना काय मशागत करावी लागते हे पहिल्याच कसोटीत अफगाणिस्तान संघाने चांगलेच अनुभवले आहे. मागच्या आठवड्यात स्कॉटलंडने केलेला इंग्लंडच्या पराभवामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा चालू झाली ती पुढील वर्षी होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत असलेल्या १० संघांच्या समावेशाचा. सध्या जगभरात फुटबॉल विश्वचषकाचा फिवर चालू आहे. रंगतदार होणारे सामने, अनपेक्षित निकाल, फॅन्समध्ये होणारी तारांबळ आणि बरेच काही मागच्या १०-१२ दिवसांपासून पाहायला मिळतेय. अश्यातच क्रिकेटवेड्या चाहत्यांकडून व क्रिकेट पंडितांकडून प्रश्न येतो तो कि जर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ३२ संघ खेळवले जातात तर मग क्रिकेटमध्ये केवळ १० संघच का? क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने एका खाजगी कार्यक्रमात आयसीसीच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. क्रिकेट खेळाला जर ग्लोबलाईस करायचा असेल तर विश्वचषकसारख्या स्पर्धेत जास्तीत जात संघ खेळवणे आवश्यक आहे. २०१५ विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या तेंडुलकरने असेही म्हटले होते कि जर मोठ्या संघांच्या ‘अ’ संघांनी छोट्या संघांचा दौरा केला तर त्याच्या फायदा अश्या संघांना नक्कीच मिळेल. केवळ विश्वचषक स्पर्धेपुरता मर्यादित न राहता असे संघ आपला खेळ उंचावू शकतात आणि याचा फायदा नक्कीच क्रिकेटच्या प्रसाराला होईल. सुनील गावस्करांचं मत याच्या अगदी उलट आहे. त्यांच्या मते जर आयर्लंड, स्कॉटलंड सारखे संघ विश्वचषक पात्रता फेरी पार करू शकत नसतील तर मग त्यांना विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. थोडक्यात, गावस्कर १० देशांच्या विश्वचषक आयोजनाचे समर्थक आहेत. मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या कॉलममध्ये त्यांनी म्हटले होते कि, एका विजयाने बऱ्याच क्रिकेट पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण तेच लोक हे विसरतात कि पात्रता फेरीसाठी असोसिएट देशांच्या जोडीला तळाचे दोन कसोटी संघही खेळले होते. आणि त्यापैकी एका कसोटी संघालाही स्पर्धेपासून मुकावे लागणार आहे. क्रिकेटच्या या दोन महान खेळाडूंकडून असे वेगवेगळे मत ऐकायला मिळाल्यानंतर मोठा प्रश्न उद्भवतो तो आयसीसीचा हा निर्णय खरंच योग्य आहे का? आता थोडंसं मागे जाऊन वळूया. २००७ सालाचा विश्वचषक जर आठवत असेल तर सर्वात ‘बोरिंग’ विश्वचषक म्हणून ओळखलं जातं. आयसीसीने ५० षटकांच्या विश्वचषकात प्रथमच १६ संघांचा समावेश केला होता. फुटबॉल विश्वचषकाच्या धर्तीवर चार गटांमध्ये प्रत्येकी चार-चार संघ विभागले होते. पहिल्याच फेरीत भारत, पाकिस्तान यांसारखे मात्तबगार संघ बाद झाल्याने स्पर्धेची रंगातच गेली. सुपर ८ सामान्यांच्या लढतीत हातापायाच्या बोटांवर मोजण्याइतकेच प्रेक्षक असायचे. अश्या वेळेस आयसीसीला मोठी समस्या उदभवली होती ती पुढच्या स्पर्धांची. जर प्रेक्षक वर्ग असाच पाठ फिरवत राहिला तर आणखी स्पर्धा आयोजित करायच्या त्या कश्या? शिवाय मोठ्या स्पर्धांतून पैसे कमवायचे कसे? त्या विश्वचषकापासून आयसीसीने पुढचे विश्वचषक स्पर्धांत केवळ १० संघ असतील अशी घोषणा केली. परंतु काही करणास्तव २०११ व २०१५ सालाच्या स्पर्धेत १४ संघ खेळवले गेले आणि २०१९ व २०२३ साली १० संघांवर आयसीसी ठाम राहिली. कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करायची झाली तर सर्वात मोठा ‘एक्स-फॅक्टर’ येतो तो म्हणजे पैसा. आणि हा पैसा अवलंबून असतो तो प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावरून. प्रेक्षकवरच ठरवत असतो तो मोठ-मोठे प्रायोजक. अश्याच स्पर्धांतून मोठ्यामोठ्या ब्रॅण्ड्सना त्यांचा प्रसार करता येतो. २००७ सालाच्या स्पर्धेस मिळाल्या प्रतिसादावरून आयसीसीला भीती वाटली ती प्रयोजकांची. आणि मग याच हेतूने त्यांनी १० देशांचा विश्वचषक स्पर्धेचा निर्णय पक्का केला. आता थोडंसं फुटबॉलकडे वळूया. फुटबॉल खेळाचा विचार केला तर केवळ दोन तासात एक सामना सहज पूर्ण होतो. पण तेच ५० षटकांचा सामना खेळावयाचा झाला तर अख्खा दिवस घालवावा लागतो. शिवाय, फुटबॉल हा खेळ खूप-खूप आधीपासून बऱ्याच देशांत खेळाला जात असल्यामुळे त्याचा प्रचार अगोदरच मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तसेच, फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय सामनेही त्यामानाने कमी खेळले जातात. क्रिकेटविषयी बोलायचं झालं तर ५० षटकांच्या सामन्यास तळागाळाच्या संघांचा पाहिजे तसं प्रदर्शन आजवर पाहावयास मिळालेलं नाही. २००७ विश्वचषकाचाच विचार केला तर ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघाने दुबळ्या नेदरलँड व स्कॉटलंड संघांना अक्षरशः धुतले होते. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडचा २०३ धावांनी तर नेदरलँडचा २२९ धावांनी धुव्वा उडवला होता. तेच दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडला २२१ धावांनी पराभूत केले होते तर स्कॉटलँडला ७ गड्यांनी मात दिली होती. जर अशेच निकाल लागत राहिले तर दर चार वर्षांनी खेळलेल्या जाणाऱ्या विश्वचषकासारख्या स्पर्धेची रंगात वाढणार ती कशी? असो. टी-२० च्या झटपट क्रिकेटमध्ये जास्तीत संघांना स्थान देऊन नक्कीच क्रिकेटचा प्रसार करता येईल. आणि त्याची सुरुवात कि काय, आयसीसीने सर्व सदस्य देशांना टी-२० आंतरराष्ट्रीय सामान्यांचा दर्जा बहाल केला आहे. पण ५० षटकांच्या सामान्यांसाठी नक्कीच छोट्या संघांना बराच घाम गाळण्याची गरज आहे. अफगाणिस्तान व आयर्लंड यांसारख्या संघांना कसोटीच्या मान्यता दिल्यानंतर मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळताना काय मशागत करावी लागते हे पहिल्याच कसोटीत अफगाणिस्तान संघाने चांगलेच अनुभवले आहे.]]>