न्युझीलंडच्या आक्रमकतेपुढे भारतीय बचाव हतबल, शेवटच्या साखळी सामन्यात भारताचा २-० ने पराभव मुंबई: पहिल्या सामान्यास मिळालेला प्रेक्षकांचा चिमूठभर प्रतिसाद, त्यानंतर सुनील छेत्रीने केलेले आव्हान, दुसऱ्या सामन्यात भर पावसात प्रेक्षकांनी लावलेली हजेरी, सुनील छेत्रीचा शंभराव्या सामन्यात झालेला झकास खेळ. प्रेक्षकांना केलेल्या आव्हानाला भारतीय फुटबॉल रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि पुढच्या दोन सामन्याची तिकिटे एक झटक्यात संपली. मग काय, आज दिवसभर रिमझिम पडत असलेल्या पावसातही प्रेक्षक सामान्याकडे वळले आणि न्यूझीलंडने भारतीय रसिकांची निराशा करीत भारताचा २-१ असा निसटता प्रभाव केला. येथील मुंबई फुटबॉल अरेनाच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात भारतीयांनी पहिल्या हाफमध्ये न्यूझीलंडच्या आक्रमकाला तोडीस तोड उत्तर देत सामना गोलशून्य बरोबरीत रोखला. आजच्या सामान्याचं विशेष म्हणजे भारताचा धडाकेबाज फॉरवर्ड प्लेयर जेजे ललपेखलुआचा भारतासाठी आज पन्नासावा सामना होता. परंतु भारताने त्याला पहिल्या हाफमध्ये बेंचवर ठेवले होते. स्पर्धेच्या आतापर्यंत झालेल्या सामन्यांत दुसऱ्या हाफमध्ये गोलची बरसात होताना प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती आजची पाहायला मिळली. ४७ व्या मिनिटाला न्यूझीलंडचा गोलकिपर वूडकडे पास केला चेंडूं तो जमा न करता तसाच पास करायला गेला. जोराने किक केलेला चेंडूं पुढ्यात उभ्या असलेल्या छेत्रीच्या पायाला लागून थेट गोलपोस्टमध्ये धडकला आणि भारताचं खातं उघडलं. पण न्यूझीलंडने वेळ न दवडता पुढच्याच मिनिटाला चपळाई दाखवत गोल करीत बरोबरी केली. या वेळेस न्यूझीलंडसाठी धावून आला तो डी जोंग. भारताने याआधीचे दोनही सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला असल्यामुळे आजचा सामन्याचा निकाल भारतासाठी इतका महत्वाचा नव्हता. पण पहिल्या सामन्यात चायनीस तैपेईला ५-० ने व केनियाला ३-० ने धूळ चारीत स्पर्धेत वर्चस्व गाजवलेल्या भारताकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. सामन्याचा विचार केला तर न्यूझीलंड आजच्या सामन्यात भारतापेक्षा सरस होता. न्यूझीलंडला तब्बल आठ कॉर्नर मिळाले तर भारताला एकही नाही. भारताच्या काही चुकांमुळे प्रतिस्पर्ध्यांना फ्री-किकही मिळाले. तर चेंडू टार्गेटवर ही मारण्यास भारतीय खेळाडू पिछाडीवर होते. सामना संपण्यास काहीच मिनिटे शिल्लक असताना ८५ व्या मिनिटाला मोझेस डायरने अमरिंदर सिंघल चकमा देत न्यूझीलंडसाठी पुन्हा एकदा चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला आणि महत्वाची २-१ अशी आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने मिळाली हि आघाडी अतिरिक्त पाच मिनिटांतही कायम ठेवत सामना २-१ अश्या फरकाने जिंकला.]]>