हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवासने केला स्मृती मंदनाच्या ट्रेलब्लेझर्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव

महिला आयपीएलसाठी प्रदर्शनीय महिला टी-२० चॅलेंज सामन्यात शेवटच्या चेंडूवर रंगलेल्या सामन्यात सुपरनोवासने तीन गडी राखत विजय मिळवला. मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आपल्या शेवटच्या टप्प्यात आली असताना येथे आयोजित केलेल्या महिला टी-२० चॅलेंज सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवासने स्मृती मंदनाच्या ट्रेलब्लेझर्सवर तीन गडी राखत विजय मिळवला. बीसीसीआयने आयोजित केलेल्या या सामन्याची रंजकता अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेली आणि एका चेंडूत पाहिजे असलेली एक धाव पूजा वस्तारकरने करीत सुपरनोवासला विजय मिळवून दिला. १३० धावांचं आव्हान पार करण्यास उतरलेल्या सुपरनोवाससाठी मिथाली राज व डॅनियल वायट यांनी आक्रमक सुरुवात करून देत लक्ष्य आरामात पार करून देण्याचे संकेत दिले. मिथाली राज (१७ चेंडू २२ धावा) बाद होण्यापूर्वी सलामीची ३२ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी रचून दिली. पुढच्याच षटकात पुनम यादवने डॅनिअल वायटला (२० चेंडू २२ धावा) बाद करीत संघाला मोठा धक्का दिला. मेग लॅनिंगलाही पूनमने नवव्या षटकात बाद करीत तिसरा धक्का दिला. स्मृती मंदनाच्या ट्रेलब्लेझर्सने नंतर चपळ गोलंदाजी करीत सुपरनोवासला एक-एक धावेसाठी रडविले. मधल्या षटकांत केलेली सुरेख गोलंदाजी शेवटच्या षटकात चार धावांवर येऊन पोचली. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी एलिसा पेरीने पूजा वस्तारकरच्या साथीने या चार धावा संयमाने करीत सुपरनोवासला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूंवर पाहिजे असलेल्या एक चेंडूवर एक धाव करताना झुलन गोस्वामीने पूजा वस्तारकारचा झेल सोडला आणि सामना बरोबरीत सुटण्यापासून वाचविला. तत्पूर्वी, मुंबईच्या वानखेडे मैदानावर हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत स्मृती मंदानाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीस उतरलेल्या एलिसा हिली व स्मृती मंदाना या जोडला दुसऱ्याच षटकात फोडण्यात सुपरनोवासला यश आलं. मेगान स्कटने हिलीला (६ चेंडू ७ धावा) बाद करीत संघाला पाहिलं यश मिळवून दिलं. स्मृती मंदानाही पुढच्याच षटकात एलिसा पेरीच्या गोलंदाजीवर बाद झाली. या वेळेस हरमनप्रीतने एक अप्रतिम झेल घेत स्मृतीला तंबूत धाडले. तिने ९ चेंडूंत ३ चौकारांसह १४ धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेली चिवट फलंदाजी संघाला १२९ धावसंख्येपर्यंत घेऊन गेली. सुझी बेट्स (३७ चेंडू ३२ धावा), दीप्ती शर्मा (२२ चेंडू २१ धावा), जेमिमा रॉड्रिग्स (२३ चेंडू २५ धावा यांनी मधल्या फळीत योगदान दिलं. सुपरनोवाससाठी पेरी व स्कट यांना प्रत्येकी २ तर अनुजा पाटील व राजश्री गायकवाड यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *