द. ग. तटकरे मा. वि. भालगाव शाळेला ३० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्त साधत शिक्षक वर्ग व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केला होता भव्य दिव्य कार्यक्रम विशेष प्रतिनिधी, रोहा: तालुक्यातील भालगाव सारख्या दुर्गम खेडेगावातूनही मोठे मोठे डॉक्टर्स, मोठे इंजिनियर्स, एवढेच नाही तर सरकारी सेवा, व्यवसाय, आय. टी. क्षेत्रात उच्च पद, फार्मा कंपनीतही उच्च पदावर रुजू. अशी परंपरा राखलीय ती तटकरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी. विशेष सोयीसुविधांचा अभाव असतानाही शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचा आयुष्यात झालेल्या बदलाचा व परिणामाचा मागील ३० वर्षांपासून अनुभव घेतलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींचा उजाळा दिला. आणि या क्षणाचं निमित्त होतं ते माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच. शाळेला ३० वर्षे पूर्ण झाल्याचं निमित्त साधत शिक्षक वर्ग व २०१२ साली स्थापन झालेली माजी विद्यार्थी संघटना यांनी आयोजन केल्या मेळाव्याला अगदी पहिल्या बॅचपासूनच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून हजेरी लावली. १९८८ साली सुरु झालेल्या शाळेने अनेक अडचणींना सामना करीत कश्या प्रकारे परिस्थितीचा सामना केला आणि विद्यार्थ्यांना घडविले याची आठवण करून दिली ती शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री मोडक सर यांनी. तर सह शिक्षक श्री अडसूळ सर यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये शाळेने अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा या क्षेत्रांतही शाळेने कशी कशी प्रगती केली यांच्याही विशेष आठवणींचा उजाळा करून दिला. कार्यक्रमाला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनीही सुसंवाद साधत आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. आपल्या वैयक्तिक व खासगी जीवनात शालेय जीवनाचा हातभार कसा लागला याही आठवणी यावेळेस सांगितल्या. तसेच माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांशीही सुसंवाद साधत शिक्षकांच्या व ग्रामस्थ्यांच्या योगदानाचा जीवनात झालेल्या योगदानाबद्दल आभार व प्रेम नम्रपणे व्यक्त केले. दिवसेंदिवस वाढलेल्या शहरीकरणामुळे घटत चाललेली पटसंख्या शाळेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या विषयावर बोलताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री गावंड सर यांनी कमी होत चाललेली पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक घेत असलेल्या मेहनतीची माहिती उपस्थित माजी विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचं आव्हानही या वेळेस करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रात नेहमीच उंच कामगिरी करणाऱ्या या शाळेतून राज्य पातळीबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी इच्छा या वेळेस उपस्थित मार्गदर्शकांडून करण्यास आली. आणि या कार्यात माजी विद्यार्ध्यांच्या सहकार्याचीही गरज आहे असे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती मोंडे मॅडम यांनी भूषविले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग, शाळा समितेचे पदाधिकारी, शाळेच्या उद्धारास ज्यांचे मोलाचे हातभार लाभले असे श्री भेकरे साहेब, घाडगे महाराज यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री विलास आर्डे, माजी विद्यार्थी व भालगाव ग्रामपंचायतीचे सदस्य श्री सोपान मनवे, संघटनेचे आघाडीचे कार्यकर्ते व रोहा तालुक्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री उदय शेलार यांनीही उपस्थिती दाखवली.]]>