पेनल्टी दवडूनही चेन्नईची विजयासह आघाडी

चेन्नई: पुर्वार्धात रेने मिहेलीच याने पेनल्टी दवडल्यामुळे नेहरू स्टेडियमवरील चेन्नईच्या चाहत्यांना धक्का बसला होता. रेने याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या रॅफेल आगुस्टो याने चेन्नईला तारले. सात मिनीटे बाकी असताना त्याने उजवीकडून आगेकूच करीत ग्रेगरी नेल्नसला अचूक पास दिला. त्यावेळी पुण्याचे बचावपटू निर्णायक हालचाल करण्यापूर्वीच नेल्सनने चेंडू नेटमध्ये मारला. हाच गोल निर्णायक ठरला. चेन्नईने दहा सामन्यांत सहावा विजय मिळविला. दोन बरोबरी व दोन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे सर्वाधिक 20 गुण झाले. त्यांनी बेंगळुरू एफसीला मागे टाकले. बेंगळुरू नऊ सामन्यांतून 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर गेले आहे. पुण्याला दहा सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. पाच विजय आणि एका बरोबरीसह 16 गुण मिळवून त्यांचा तिसरा क्रमांक कायम राहिला. 23व्या मिनीटाला नाट्य घडले. पुण्याच्या आदिल खानने घोडदौड करणाऱ्या नेल्सनला मागून ढकलले. हे पेनल्टी क्षेत्राजवळ घडले. त्यामुळे चेन्नईला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर पुण्याच्या खेळाडूंनी पंचांशी प्रतिवाद घातला. यात दीड-दोन मिनिटे वाया गेली. अखेरीस 25व्या मिनीटाला पेनल्टी घेण्यासाठी चेन्नईचा दहा नंबरची जर्सी घालणारा रेने पुढे आला. त्याने उजव्या पायाने हळुवार फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पुरेशा ताकदीने चेंडू मारता आला नाही. मुख्य म्हणजे पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याने अचूक अंदाज घेत चेंडू थोपविला. रिबाऊंडवर प्रयत्न करण्यासाठी रेने पुढे सरवासला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. चेन्नईला कॉर्नर मिळाला, पण तो वाया गेला. पहिल्याच मिनीटाला चेन्नईच्या जेजे लालपेखलुआने डावीकडून आगेकूच केली. त्याने डाव्या पायाने फटका मारला, पण पुण्याच्या आदिलने बचाव केला. चौथ्या मिनीटाला चेन्नईला कॉर्नर मिळविला. त्यावर पुण्याच्या रोहीत कुमारने चेंडूचा अचूक अंदाज घेतल्याने चेन्नईची संधी हुकली. आठव्या मिनीटाला पुण्याला संधी मिळाली होती. एमिलीयानो अल्फारोने चाल रचत दिएगो कार्लोसला पास दिला. चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंग पुढे सरसावला. त्याने चेंडू थोपविला, पण रिबाऊंडवर आशिक कुरूनीयान याने कमकुवत फटका मारला. तो मैल्सन आल्वेसने पायाने अडविला. 35व्या मिनीटाला आशिकने दिएगोच्या पासवर प्रयत्न केला, पण त्यात अचूकता नव्हती. 12व्या मिनीटाला दिएगोने मारलेला ताकदवान फटका क्रॉसबारला लागणे पुण्यासाठी निराशाजनक ठरले. पुण्याकडून अल्फारोने चांगली घोडदौड केली. 22व्या मिनीटाला त्याच्या पासवर जोनाथन ल्युकाला ताकदवान फटका मारता आला नाही. त्यामुळे करणजीतने चेंडू सहज अडविला. 27व्या मिनीटाला इनिगो कॅल्डेरॉनने उजवीकडून आगेकूच केली. त्याने जेजेच्या दिशेने चेंडू मारला, पण जेजेचे हेडींग चुकले. 35व्या मिनीटाला आशिकच्या पासवर दिएगो करणजीतला चकवू शकला नाही. 41व्या मिनीटाला ल्युकाचा फटका चुकला. दुसऱ्या सत्रात 48व्या मिनीटाला ग्रेगरीने डाव्या पायाने मारलेला फटका कैथने सहज अडविला. 74व्या मिनीटाला ग्रेगरीने उजवीकडून घोडदौड केली. त्याने मैदानालगत मारलेला चेंडू पुण्याच्या रॅफेल लोपेझने अडविला. निकाल: चेन्नईयीन एफसी: 1 (ग्रेगरी नेल्सन 83) विजयी विरुद्ध एफसी पुणे सिटी: 0]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *