मुंबई: संस्कृती आणि कला यांचा मिलाप साधत झी टॉकीज सातत्याने रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रयत्नशील असतं. हीच परंपरा कायम राखत, आपल्या रांगड्या संस्कृतीचा वारसा पुढे नेत, आपल्या मर्दानी मातीतला कुस्तीचा खेळ महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवण्यासाठी ‘ताकदीची कुस्ती आणि मनोरंजनाची मस्ती’ हे घोषवाक्य घेऊन झी टॉकीज ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ या भव्यदर्व्य स्पधेचे आयोजन करीत आहे. ‘झी टॉकीज’ने आजवर अनेक वैविध्यपूर्ण सिनेमे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची पर्वणी देत आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी माणसाने कितीही प्रगती केली, तंत्रज्ञानाची शिखरं गाठली तरी त्याच्या मनात या मातीविषयी ओढ रुजलेली असते. याच मातीशी नाळ जोडणारा क्रीडाप्रकार म्हणजे कुस्ती. झी टॉकीज महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र कुस्ती लीग” हा एक विलक्षणीय उपक्रम झी टॉकीजतर्फे आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या उदघाटणी प्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व महाराष्ट्र कुस्ती लीगचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी उपस्थित माध्यमांना आपली कुस्तीविषयी आवड व त्यातील रस याची आठवण देत या कुस्ती लीगला प्रक्षकांसोबतच माध्यमांनीही चांगला प्रतिसाद देण्याचं आव्हान केलं. प्रसंगी उपस्थित झी समूहाचे मालक व राज्यसभा खासदार श्री. सुभाष चनद्र यांनीही भारतातल्या क्रीडा विश्वात झी समूहाचा हातभार व भारतीय क्रीडा संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याचं आश्वासनही दिलं. सोहळ्यासाठी मराठी कलाकार दीपाली सय्यद, शरद केळकर, दिग्दर्शक संजय जाधव, भूषण प्रधान, महेश कोठारे, सुशांत शेलार यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली.]]>