नवसंजीवन योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

जळगाव: नवसंजीवन योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हारोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक संजय दहिवाले, यावल आदिवासी प्रकल्पाधिकारी आर.बी.हिवाळे, बाल कल्याण उप मुख्य कार्यकारी आर.आर. तडवी. निमंत्रीत सदस्य श्रीमती प्रतिभा शिंदे, डॉ. पंकज शहा डॉ. सुशिल गुजर आदि समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीस मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले, आदिवसी क्षेत्रात रहणाऱ्या आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचवून त्यांना विकासांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवसंजिवनी योजनांच्या माध्यमांतून त्यांना मुलभुत सेवा पुरविण्यात येतात. यात प्रामुख्याने रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळण-वळण, यांचा सामावेश असतो. जिल्ह्यातील रावेर, यावल, व चोपडा या तीन तालुक्यांतील ५३ गावांचा नवसंजिवनी योजने अंतर्गत समावेश आहे. या गावांतील आदिवासी नागरीकांना आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार दळणवळण इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या विविध योजना कार्यन्वीत आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी संबधीत यंत्राणांनी करावी. आप-आपसात चांगला समन्वय ठेवून योजनांचा लाभ लाभार्थीपर्यत पोहचवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आदिवासी क्षेत्रातील सर्व गावांना सौरऊर्जा पुरवून ही गावे प्रकाशमान करावीत. जेथे वीज पोहचण्यास अडचण आहे. अशा आणि जेथे वीज पोहचली आहे अशा गावांत देखील सौर उर्जा पोहचवावी. यासाठी संबधीत विभागाने आराखडे तयार करावेत. तसेच या क्षेत्रातील पिण्याचे पाण्याचे नमूने तपासून घेवून त्या प्रमाणे प्रमाणपत्र द्यावीत. रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामसेवकांनी जॉबकार्ड त्वरित वितरीत करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीत रोजगार, कुपोषण, पिण्याचे पाणी, डीबीटी, शालेय पोषण आहार, जीवनमान उंचावणे याबाबत उपाय योजना आदि विषयांवर विभागावर आढावा घेण्यात आला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *