आपल्या घराच्या मैदानावर जिंकण्याची परंपरा कायम ठेवत मुंबई सिटी एफ. सी. संघाने तगड्या चेन्नयान एफ. सी. संघाचा १-० असा पराभव करीत पाहुण्यांची यंदाच्या मोसमातील विजयाची मालिका खंडित केली. मुंबई: चार सामन्यांत तीन विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या अभिषेक बच्चनच्या चेन्नयान एफ. सी. ने आज सामना केला तो रणबीर कपूरच्या मुंबई सिटी एफ. सीचा. आपल्या घराच्या मैदानावर एफ. सी. गोवा वरचा विजय सोडला तर या मोसमात साजेशी कामगिरी न केलेल्या मुंबई सिटी एफ. सी. ला आपल्या घराच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचं मोठं आव्हान होतं. पहिला हाफ गोलशून्य नाणेफेक जिंकलेल्या मुंबई सिटी एफ. सीने आपली बाजी निवडल्यानंतर चेन्नयान एफ. सीने डावीकडून उजवीकडे खेळाची सुरुवात केली. या सामन्यात विजय आवश्यक असलेल्या मुंबई सिटी एफ. सी. संघाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा जमावाला. परंतु हि आक्रमकता काहीशी जास्तच झाली आणि सहाव्याच मिनिटाला मुंबई सिटी एफ. सीच्या दविंदर सिंग याला यलो कार्ड मिळालं. याचाच फायदा चेन्नई संघाला मिळाला आणि त्यांना फ्री किक बहाल करण्यात आलं. परंतु या फ्री किकच हवा तसा फायदा चेन्नईला उचलता आला नाही. मुंबईच्या आक्रमतकेच फायदाही काही प्रमाणात पाहण्यास मिळाला. १५ व्या मिनिटाला एव्हरटोन सान्तोसने हेडरने चेंडू गोलपोस्ट मध्ये धाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु चेन्नईचा गोलकिपर करणजीत सिंगने चतुराई दाखवत अगदी सहजतेने चेंडू धोपावला. दरम्यान १९ व्या मिनिटाला मुंबई सिटी एफ. सी. चा कर्णधार लुसियन गोयेन यालाही यलो कार्ड देण्यात आलं. मुंबई सिटी एफ. सी. ची आक्रमकता पाहता चेन्नई संघानेही आपली आक्रमकता दाखवण्यास सुरुवात केली आणि अनुभवी मोहम्मद रफीने २९ व्या मिनिटाला एक संधी निर्माण करून मुंबईला धक्का देण्याचा प्रयत्न केला. या वेळेस मुंबईसाठी धावून आलं ते म्हणजे त्यांचं ‘नशीब’. लगेच दोन मिनिटांनी मुंबईलाही एक सुवर्णसंधी मिळाली आणि या वेळेस चेन्नईच्या मॉसों अल्वेसचा चांगला बचाव दाखवीत मुंबईला सुरुवातीची आघाडी घेण्यापासून रोखलं. पूर्वार्धाचा वे संपल्यानंतर पंचांनी एक मिनिटाचा वाढीव वेळ डाया आणि व वाढीव वेळेत चेन्नई जवळजवळ गोल करणार असे दिसत असताना मुंबईचा गोलकिपर अमरिंदर सिंगने आपला सर्वोत्तम खेळ दाखवत चेन्नईची एक प्रकारे आघाडी रोखली असेच म्हणता येईल. या वेळेसही चेन्नईसाठी प्रयत्न केले ते मोहम्मद रफीने. मुंबईची सरशी पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या दोन्ही संघापुढे आव्हान होतं ते सामन्यात आघाडी घेण्याचं. एकीकडे मुंबईला आपल्या घराच्या मैदानावरील विजयाची परंपरा कायम राखायची होती तर दुसरीकडे चेन्नईला मोसमात अजिंक्य राहण्याची मालिका कायम राखण्याची. मागच्या मोसमपासून मुंबई सिटी एफ. सी. संघांची खेळात झालेली सुधारणा; तीही विशेषतः घराच्या मैदानावर आजही पाहायला मिळाली. सामन्याच्या ६० व्या मिनिटाला चेन्नईच्या मेलसन अल्वेसने मुंबईच्या बलवंत सिंघल पेनल्टी कक्षात खेचले आणि पंचांनी मुंबईला पेनल्टी बहाल केली. मुंबईला मिळालेल्या या सुवर्णसंधीचा आचिल्ले इमाना याने अगदी पुरेपूर फायदा उचलत चेंडू चेन्नईचा गोलकिपर करणजीतला भेदत थेट गोलपोस्टमध्ये धाडला आणि मुंबईला १-० अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. दरम्यान, बेंचवर बसलेल्या चेन्नईच्या जेजेला मोहम्मद रफीच्या जागी मैदानात उतारण्यात आलं. परंतु त्याचाही परिमाण फारसा पाहायला मिळाला नाही. मुंबईनेही दविंदर सिंगला विश्राम देत राजू गायकवाडला मैदानात उतरलं. आक्रमकतेवर भर देणाऱ्या मुंबई संघाला आणखी एक छोटा धक्का बसला तो म्हणजे ७० व्या मिनिटाला सेहनाज सिंगला मिळालेलं यलो कार्ड. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना दोन्ही संघांनी आपल्याला संघात बदल करून सामन्यावर पकड मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु मुंबई सिटी एफ. सी. संघाने आपला बचावही कायम ठेवत चेन्नईला सहजासहजी गोल करू दिला नाही. ८७ व्या मिनिटाला चेन्नईला एक छोटीशी संधी मिळाली खरी परंतु मुंबईन सिटी एफ. सी. संघाने चपळाई दाखवीत आपली आघाडी कायम ठेवली. ९० मिनिटांच्या निर्धारित वेळेनंतर पंचांनी वाढीव चार मिनिटे दिली. या वाढीव वेळेत चेन्नईने आपली ताकद दाखवत मुंबईला दबावात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केले परंतु मुंबई सिटी एफ. सी. संघाने आपल्या घराच्या प्रेक्षकांना विजयाचा आहेर देत चांगलेच खुश केले. या विजयाबरोबरच मुंबई सिटी एफ. सी. संघाने चेन्नयान एफ. सी. संघाची यंदाच्या मोसमातील विजयाची मालिका खंडित करीत तीन महत्वपूर्ण गुणांची कामे करीत पाचव्या स्थानी झेप घेतली.]]>