बारावी परीक्षेचे अर्ज भरणेबाबत माहिती

जळगाव: फेब्रुवारी-मार्च, २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षापासून नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे भरण्याबाबत दि. १८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. खाजगी विद्यार्थ्यांनी इ.१० वी व इ.१२ वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची दक्षता घ्यावी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज ऑनलाईन्‍ (OnLine) पध्दतीने भरण्यासाठी दिनांक १८ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून दि. २३ ऑक्टोबर २०१७ ते दि. २५ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जमा करावी. संबधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व अर्ज यादी व शुल्कासह दि. २७ ऑक्टोबर २०१७ पर्यत संबंधित विभागीय मंडळात जमा करावी. संकेतस्थळ – इ. १० वी http://form१७.mh-ssc.ac.in इ.१२ वी – http://form१७.mh-hsc.ac.in विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास व्दितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलव्दारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (compulsory)आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्याथ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालील प्रमाणे इ.१० वी- रु.१०००/- नोंदणी शुल्क + ₹.१००/- प्रक्रिया शुल्क (Procesing fee) इ.१२ वी- रु.५००/- नोंदणी शुल्क + ₹.१००/-प्रक्रिया शुल्क (Procesing fee) सर्व प्रक्रिया ऑनलाईन्‍ पध्दतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यानुसार घराजवळचे शाळा/कनिष्ठ महाविद्यालय ऑनलाईन पध्दतीने देण्यात येईल. त्याच शाळेतून/क. महाविद्यालयातून प्रकल्प , प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज तसेच इ.१०वी साठी स्वाध्यायपुस्तिका सोडवून घेणे व त्यासंदर्भातील सर्व काम प्रचलित पध्दतीने मंडळाने निर्धारित केलेल्या संपर्क केंद्रामार्फत तसेच इ.१२ वी साठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत करण्यात येणार आहेत. यामध्ये इ.१० वीसाठी प्रचलित पध्दतीप्रमाणे संपर्क शिबिराचा समावेश असेल. विहित शुल्क रोखीने शाळा/ क. महाविद्यालयात जमा करावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून अर्जासोबत दिलेल्या पावत्यांपैकी विद्यार्थ्यासांठीच्या प्रतीवर स्वाक्षरी व शिक्का घेवून ती स्वत:कडे ठेवावी. दिव्यांग विद्यार्थ्यांनी खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/ कनिष्ठ महाविद्यालय / संपर्क केंद्र यांचेकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. यावर्षी पासून माहिती पुस्तिकांची छपाई करण्यात येणार नाही मात्र सदर माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२०-२५६७६४०५/२५७०५२७१ वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र /कनिष्ठ महाविद्यालयांकडून आवेदनपत्रे भरुन झाल्यावर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrolment Certificate) प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्र (examination form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. याची नोद विद्यार्थ्यांनी घ्याव. असे कृष्णकृमार पाटील सचिव राज्यमंडळ, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *