ऐन सणासुदीच्या दिवसात झालेल्या धक्कादायक दुर्घटनेमुळे मुंबईसह पूर्ण देश हादरून गेला आहे. मृतांच्या नातेवाईकास मुख्यमंत्रांनी जाहीर केली पाच लाखांची मदत. मुंबई: एल्फिन्स्टन आणि परेल या दोन स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर भर गर्दीच्या वेळेस एक मोठी दुर्घटना घडली आहे. भर कामाच्या वेळेस झालेल्या अचानक गर्दीमुळे मोठी चेंगराचेंगरी झाली आणि अरुंद अश्या पुलावरून बाहेर पडण्यास वाव न मिळाल्यामुळे गुदमरून २२ प्रवासांना आपले प्राण गमवावे लागले. राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून मृतांच्या एकूण १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पण अश्या धक्कादायक घटनेमुळे मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे बुलेट-ट्रेन सारखे मोठे प्रकल्प राबवण्याआधी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल व त्याचे प्रवासी सुरक्षित आहेत का? सकाळी १० ते ११ च्या सुमारास झालेल्या या दुर्दैवी घटनेने मुंबईसह संपूर्ण देशात हळहळ पसरली आहे. एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर झालेल्या या दुर्घटनेत १३ पुरुष, ८ महिलांसह एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचबरोबर सुमारे ३३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर केइएम आणि वाडिया या नजीकच्या रुग्णालयांत उपचार चालू आहेत. अगदी अरुंद असलेला पूल व त्यात आलेला पाउस यामुळेच ही घटना घडली असावी असा प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एल्फिन्स्टन स्थानकावर एकाच वेळेस दोन्ही ट्रॅकवर गाड्या आल्यामुळे मोठी गर्दी उसळली. त्याच वेळेस परिसरात पाऊस आल्यामुळे बऱ्याचश्या प्रवाशांनी पुलावर थांबणे पसंद केले. परिणामी रेल्वे पुलावर क्षमतेपेक्षा अधिक लोक जमा झाले. शिवाय पूल पडणार व शॉर्ट सर्किट झाला आहे अश्या अफवा पसरवण्यात आल्या आणि प्रवाशांनी बाहेर पडण्यास एकाच गर्दी केली. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांची नावं पुरुष मुकेश मिश्रा सचिन कदम मयुरेश हळदणकर अंकुश जैस्वाल सुरेश जैस्वाल ज्योतिबा चव्हाण रोहित परब अॅलेक्स कुरिया हिलोनी देढीया चंदन गणेश सिंह मोहम्मद शकील मसूद आलम महिला शुभलता शेट्टी सुजाता शेट्टी श्रद्धा वरपे मीना वरुणकर तेरेसा फर्नांडिस]]>