सहा वर्षे उलटली, तरी सरकार अजून झोपलेलंच. हॉकीपटू युवराज वाल्मिकीची ट्विटरवर मदतीची हाक

राष्ट्रीय खेळाडूंची उपेक्षाच. युवराज वाल्मिकी, धनंजय महाडिक यांसारख्या राष्ट्रीय हॉकी खेळाडूंना सरकार, ‘बिल्डर’ कडून केराची टोपली. कोणताही खेळाडू जेव्हा मैदानात उतरतो तो जिंकण्याच्या जिद्दीने. आणि जर तो खेळाडू आपल्या देशासाठी खेळतो तेव्हा त्याचं लक्ष्य असतं ते फक्त आणि फक्त देशाचं नाव उंचावण्याचं,  देशाला जगभरात कीर्तिमान मिळवून द्यायचं. जेव्हा हे खेळाडू देशाला जगाच्या नकाशावर एक वेगळं स्थान मिळवून देतात तेव्हा त्यांना सरकार, विविध संस्था यांच्याकडून विविध आश्वासनं दिली जातात, जी काही अंशी पूर्णही केली जातात. भारतात क्रिकेट सोडला तर इतर खेळांना, विशेषतः सांघिक खेळांना म्हणावं तसं प्राधान्य मिळत नाही. परिणाम भारतातील पालक आपल्या मुलांना एखाद्या खेळासाठी बालवयापासूनच प्रवृत्त करताना दहा वेळा विचार करतात. परंतु अश्याच बिकट परिस्थितीत मुंबईच्या मारिन लाईन्स येथील झोपडपट्टीत युवराज वाल्मिकीसारखा युवा हॉकीपटू घडला आणि त्याने भारताला हॉकीमध्ये पुनर्जीवित करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. २०११ सालच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी घर देण्याचं आश्वासन दिलं. आज सहा वर्षे उलटून गेली, परंतु आजही युवराजच्या मागे उपेक्षाच. सरकार बदललं,  नवी आश्वासन आली परंतु सद्यस्थिती जैसे थे. देशासाठी बिकट परिस्थितीवर मात करूनही जर खेळाडूंची अशी अवस्था असेल तर येणाऱ्या भविष्यात भारत एकतरी मेडल जिंकेल का हो? आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी युवराज वाल्मिकीने ट्विटर या माक्रोब्लॉगिंग साईटची मदत घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा केली आहे. त्याच्या या हाकेला नव्या क्रीडा मंत्र्यांकडून तरी दाद मिळेल व त्याला दिलेले घराचं आश्वासन हे सरकार तरी पूर्ण करेल हीच अपेक्षा.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *