तिरंगी मालिकेसाठी युवा भारतीय संघ सज्ज

प्रमुख खेळाडूंच्या विशेषतः बंगळूरू एफ. सी. च्या खेळाडूंशिवाय भारतीय फुटबॉल संघ नवा कर्णधार संदेश जन्घानीच्या नेतृत्वात उद्या करणार मॉरीशिशसमोर दोन हात. मुंबई: भारतीय फुटबॉल संघ नवीन जोशाच्या खेळांडूंसह उद्यापासून होणाऱ्या हिरो ट्राय नेशन फुटबॉल स्पर्धेत मॉरीशिशबरोबर आपला पहिला सामना खेळेल. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवीन खेळाडूंना आजमावण्याची एक संधी आहे असे म्हणत ही स्पर्धा आमच्यासाठी महत्वपूर्ण असेल असे म्हटले आहे. “ए. एफ. सी. आशिया चषक पात्रता स्पर्धेपूर्वी पूर्वी आम्ही हे दोन सामने खेळणार आहोत जे आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. आम्ही या स्पर्धेत नवीन खेळाडूंना आजमावणार आहोत. स्पर्धेतील एक संघ आफ्रिकेतील तर दुसरा संघ दक्षिण अमेरिकेतील आहे. आम्ही यापूर्वी जे सामने खेळलोय ते बहुतेक आशियाई संघांशी खेळलो आहोत. त्यामुळे आम्हाला ही स्पर्धा खूप महत्वपूर्ण असेल. आशिया चषक पात्रता स्पर्धेसाठी ही आमच्यासाठी एक कठीण असेल.” भारतीय संघ सध्या भलताच फॉर्मात आहे. मागील १५ सामन्यांपैकी तब्बल १३ सामने (ज्यात २०१६ मधील भूतान विरुद्धचा एक मैत्रीपूर्ण सामना समाविष्ट) जिकंले आहेत. “आम्ही जूनपासून एकत्र खेळलो  या स्पर्धेकरवी आम्हाला एकत्र येऊन संघात चांगला समन्वय आणता येईल.” ते पुढे म्हणाले. या स्पर्धेत भारताचे प्रमुख खेळाडू नसणार आहेत. स्पर्धेतील संघात २३ वर्षांखालील संघातील १० खेळाडूंचा भरणा आहे. म्हणजेच संघ हा युवा आहे. तसेच संघाची धुरा युवा संदेश झिंगान याच्यावर सोपवली आहे. भारत उद्या मुंबई येथील मुंबई फुटबॉल अरेना येथील  मैदानावर मॉरीशिशसोबत पहिला सामना खेळात स्पर्धेची सुरुवात करेल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *