वल्लभगड:- गेल्या दोन वर्षापासून दुर्गवीर प्रतीष्ठान या संस्थेमार्फत वल्लभगडावर संवर्धन (स्वच्छता) मोहीम प्रत्येक रविवारी सूरू आहे. या मोहीमेमध्ये आता स्थानिक शाळकरी मुलेही सहभागी होत आहेत. दिवसेंदिवस या मोहिमेत मावळ्यांची संख्या वाढतच आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले गड-किल्ले टीकवण्याचे काम गेली ९ वर्षे ही संस्था महाराष्ट्रात व सीमाभागात करीत आहे. वल्लभगड, सामनगड, कलानिधीगड व महाराष्ट्रात इतर गडांवर श्रमदानाचे काम सूरू आहे. वल्लभगडावर चिकाची झुडपे व काटेरी झाडे नष्ट करून आता बुरुजावरील ढासळलेले दगड पुन्हा बुरुजावर ठेवण्याचे काम सूरू आहे. कर्नाटक सरकार या किल्ल्याकडे कधी लक्ष देणार कुणाच ठाऊक . पण या चिमुरड्यांच्या हस्ते तरी नकीच या किल्ल्याचा विकास होईल असे त्यांचे काम पाहून वाटत आहे. वल्लभगडावर दोन वर्षापासून सूरू असलेल्या या श्रमदानाला या परीश्रमाला नकीच यश येईल यात शंका नाही.]]>