अफगाणिस्तान, आयर्लंड नवे कसोटी संघ

लंडन: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आय. सी. सी. च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अफगाणिस्तान व आयर्लंड या असोसिएट संघांना फुल मेम्बर्स बहाल करण्यात आलं. याचाच अर्थ आय. सी. सी. कसोटी मान्यताप्राप्त संघांमध्ये अकरावा व बारावा संघ म्हणून या दोन संघांना पद मिळालं आहे. दोन्ही संघांनी यापूर्वीच पूर्ण सदस्यत्वासाठी आय. सी. सी. कडे अर्ज केला होता. आज झालेल्या बैठकीत इतर बोर्डांच्या सदस्यांनी अपेक्षितरित्या या दोन्ही संघासाठी मतदान केले आणि दोन्ही संघाचा कसोटी खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. आयर्लंडला २००५ मध्ये तर अफगाणिस्तानला २००९ मध्ये एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची मान्यता मिळाली होती. संघ व त्यांना मिळालेली कसोटी मान्यता: १८७७ – ऑस्ट्रेलिया / इंग्लंड १८८९ – दक्षिण आफ्रिका १९२८ – वेस्ट इंडिज १९३० – न्यूझीलंड १९३२ – भारत १९५२ – पाकिस्तान १९८२ – श्रीलंका १९९२ – झिम्बाब्वे २००० – बांगलादेश २०१७ – अफगाणिस्तान /आयर्लंड]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *