सनातनचे साधक समीर गायकवाड यांना जामीन संमत

कॉ. पानसरे हत्या प्रकरण, हिंदुत्वनिष्ठांमध्ये जल्लोष ! कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) – महाराष्ट्रात गाजत असलेल्या कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचा सहभाग नसल्याचे महत्त्वाचे सूत्र ग्राह्य धरून १७ जूनला येथील अतिरिक्त सत्र आणि जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी २५ सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर श्री. समीर गायकवाड यांची सुटका केली. श्री. समीर यांना जामीन देतांना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. यामध्ये श्री. समीर यांनी महाराष्ट्राच्या बाहेर न जाणे, न्यायालयीन साक्षी आणि तारखा यांव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यात न येणे यांसह इतर अटींचा समावेश आहे. श्री. समीर यांना जामीन मिळाल्याची वार्ता समजताच हिंदुत्वनिष्ठांनी आनंद व्यक्त केला, तसेच काही हिंदुत्वनिष्ठांनी न्यायालयाच्या बाहेर जल्लोष केला. गेल्या दोन दिवसांमध्ये सनातनचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी युक्तीवाद मांडला. यामध्ये श्री. पटवर्धन यांनी श्री. समीर गायकवाड यांचा या प्रकरणात सहभाग नसल्याने त्यांना जामिन देण्याची आग्रही मागणी केली, तर अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी या प्रकरणात आणखी दोन आरोपी म्हणजे एकूण ४ मारेकरी असल्याचा खोटा युक्तीवाद केला होता. जामीन संमत करतांना न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी वरील अटींबरोबर प्रती रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष अन्वेषण पथकाच्या (एस्आयटीच्या) कार्यालयात उपस्थिती दर्शवणे; पारपत्र (पासपोर्ट) असेल, तर ते पोलिसांकडे जमा करणे; स्वतःच्या ओळखीचा पुरावा देणे (मतदान कार्ड) अशा अटी घातल्या आहेत. न्यायालयाने जामीन संमत केला, तरी कागदपत्रांची पूर्तता करून श्री. समीर गायकवाड यांची सोमवार, १९ जूनला कळंबा कारागृहातून सुटका होईल. १७ जून या दिवशी सनातनच्या कोल्हापूर सेवाकेंद्राला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *