संतांच्या उपस्थितीत अन् वेदमंत्रांच्या घोषात सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला गोव्यात प्रारंभ !

हिंदु राष्ट्र होण्यापासून हिंदूंना कोणी रोखू शकत नाही ! – प.पू. साध्वी सरस्वतीजी फोंडा (गोवा) – भारतावर आज सर्वत्र आक्रमण होत आहे. काश्मीर तोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. अमरनाथ यात्रा थांबवण्याचे प्रयत्न होत आहेत. भारतमाता-गोमाता यांना आज दूषणे दिली जात आहेत. स्वतंत्र भारतात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच हिंदू अधिवेशन यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे; मात्र विरोधकांनी हे लक्षात ठेवावे की, देशातील कोणतीही शक्ती हिंदु राष्ट्र होण्यापासून रोखू शकत नाही. एका ‘सनातन’वर, ‘हिंदु जनजागृती समिती’वर बंदी घातली, तर त्यातून सहस्रो सनातन निर्माण होतील. भगवा आतंकवाद असे काही नसून देश, धर्म यांसाठी समर्पित जीवन म्हणजे भगवा होय, असे जाज्वल्य मार्गदर्शन छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या अध्यक्षा प.पू. साध्वी सरस्वतीजी यांनी केले. त्या फोंडा, गोवा येथील रामनाथी देवस्थानाच्या विद्याधिराज सभागृहात होत असलेल्या सहाव्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त पहिल्या दिवशी झालेल्या उद्घाटन सत्रात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु समाज आणि संतसमाज यांच्या संघटनाची आवश्यकता’ या विषयावर बोलत होत्या. अधिवेनशनाचा प्रारंभ शंखनाद करून करण्यात आला. यानंतर प.पू. साध्वी सरस्वतीजी,उत्तरप्रदेश येथील हिंदु स्वाभिनान मठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा यति मां चेतनानंद सरस्वतीजी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथून १३२ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ५३८ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. या वेळी हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती’ या मराठी, तसेच हिंदी भाषिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी वीरत्व धारण करावे ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी

केवळ हिंदु धर्म हाच खरा मानवतावादी धर्म आहे. जगात हिंदु धर्म वाचला, तरच मानवतेचे रक्षण होऊ शकेल. इतिहासकाळापासून ज्या ज्या वेळी हिंदु धर्मावर आक्रमणे झाली, त्या त्या वेळी हिंदूंनी क्षात्रवृत्तीने प्रतिकार करून ती परतवून लावली. सनातन धर्म हा आक्रमणांना प्रतिकार करायला शिकवतो. आजही हिंदु धर्मावर अनेक आघात होत आहेत. या आघातांचा प्रतिकार करून हिंदु धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदूला स्वत:मध्ये वीरत्व धारण करावे लागेल, असे आवाहन यति मां चेतनानंद सरस्वतीजी यांनी केले.

हिंदु राष्ट्राची स्थापना हेच सर्व समस्यांवरील उत्तर !- पू. डॉ.चारुदत्त पिंगळे

एकीकडे घटनेने सर्वांना समान अधिकार दिला आहे, असे आपण म्हणतो; मात्र त्याच वेळी शाळेत हिंदूंना धर्मशिक्षण नाकारले जाते आणि अहिंदूंना ते घेण्याचा अधिकार आहे. आज केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केले जाते, हिंदूंच्या मंदिरांचा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरला जातो, याउलट अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे कधीच कह्यात घेतली जात नाहीत. समान नागरी कायद्याची सक्ती हिंदूंनाच केली जाते. अशा लोकशाहीत कधीतरी हिंदूंना न्याय मिळेल का ? सध्याची राज्यव्यवस्था हिंदु धर्मीय आणि भारतभूमी यांचे रक्षण करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र हेच सर्व समस्यांवर उत्तर आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हा आमचा केवळ विचार नसून ते आमचे व्रत आहे आणि घटनात्मक अधिकार वापरून आम्ही ते पूर्ण करणारच, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

देशावर इंग्रजांनी लादलेले फसवे लोकराज्य हटवावेच लागेल !- श्री. रमेश शिंदे

देशव्यापी हिंदूसंघटनाचे कार्य करणाऱ्या हिंदु जनजागृती समितीस आज ‘फ्रिंज ऑर्गनायझेशन’ म्हणून हिणवण्यात येत आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणा देणाऱ्यांवर आज बंदी नाही, तर लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या हिंदु अधिवेशनावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. भारतात मुसलमान आक्रमक आणि इंग्रज येण्यापूर्वी भारत हे एक समर्थ हिंदु राष्ट्र होते. आमच्याकडे कौटिल्याचे अर्थशास्त्र होते, स्थापत्यशास्त्र, नृत्यशास्त्र आदी सर्वकाही समृद्ध होते. असे असतांना आम्हाला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची वेगळी ‘ब्लू प्रिंट’ सिद्ध करण्याची आवश्यकताच काय ? आम्ही तर या देशावर इंग्रजांनी लादलेले फसवे लोकराज्य हटवण्याची ‘ब्लू प्रिंट’ बनवत आहोत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची भूमिका’ या विषयावर बोलतांना केले.

हिंदु संघटना आणि संतांचे संघटन ही काळाची आवश्यकता ! – पू. नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था

सध्या हिंदु समाजासमोर गोरक्षण, लव्ह जिहाद, धर्मांतरण यांसरख्या अनेक समस्या असून त्यांसाठी प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या स्तरांवर प्रयत्न करत आहेत. हे पुरेसे नसून त्यासाठी आता व्यापक संघटनाची आवश्यकता आहे. त्यामुळे विचारवंत, संप्रदाय, अधिवक्ता, हिंदु संघटना आणि संतांचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. नंदकुमार जाधव यांनी केले. ते ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता आणि हिंदूसंघटनाची दिशा !’, या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते.

हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवतांना कितीही विरोध झाला, तरी मागे हटणार नाही ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

सध्याच्या सरकारच्या संकुचित दृष्टीकोनामुळे राममंदिराची स्थापना आणि गोहत्या बंदी होऊ शकली नाही. भ्रष्टाचार, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, हिंदुत्वनिष्ठांचा छळ चालूच आहे. हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवतांना कितीही विरोध झाला, तरी मागे हटणार नाही. सध्याची भ्रष्ट आणि अनैतिक समाजव्यवस्था हटवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्य करणार आहेत. ‘ही माझी मातृभूमी आहे, हे माझे राष्ट्र आहे’, हा आवाज अंतरातून येऊ दे, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री.अभय वर्तक यांनी केले. श्री. रमेश शिंदे राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, संपर्क क्रमांक : 09987966666]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *