दादरमध्ये घडणार हिंदू एकतेचा अविष्कार

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन मुंबई – पुरोगामीत्वाच्या नावावर हिंदु धर्मावर राजरोसपणे केली जाणारी टीका, देवीदेवतांचे विडंबन, प्रलोभने दाखवून हिंदूंचे केले जाणारे धर्मांतरण, धर्मांधामार्फत विविध प्रकारच्या जिहादद्वारे हिंदूंवर निर्माण केली जाणारी दहशत, हिंदु संतांची काही प्रसारमाध्यमांकडून केली जाणारी नाहक बदनामी यांमुळे हिंदु धर्माची अपरिमीत हानी झाली आहे. त्यामुळे आज कधी नव्हे, एवढी हिंदूऐक्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समस्त हिंदूंना एकत्रित करून त्यांना कृतीप्रवण करण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून मुंबईतील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटना, संप्रदाय आणि मंडळे शनिवार, दि. ६ मे या दिवशी दादर येथे हिंदूऐक्य दिंडी काढण्यात येणार आहे. हिंदु एकतेचा अविष्कार घडवण्यासाठी ही दिंडी असणार आहे. सायं. ५ वाजता कबुतरखाना जवळील गोल देऊळ येथून दिंडीला सुरुवात करण्यात येणार असून दादर पूर्वेतील स्वामीनारायण मंदिराजवळ दिंडीचा समारोप होणार आहे. समारोपाच्या ठिकाणी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आपले प्रखर विचार मांडणार आहेत. अधिकाधिक हिंदूंनी या ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *