दहापैकी आठ सामन्यांत विजय मिळवत मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाली. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ११ सामन्यांत तब्बल आठ सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. जेव्हा तुमचे दिवस खराब असतात तेव्हा तुमच्या कठीणहून कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आला. अगोदरच स्पर्धेवर पडलेल्या रॉयल्सला आजची फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यांची यंदाच्या मोसमातील खराब कामगिरी चालू राहिली. मागच्या मोसमात विराट कोहलीने जश्या प्रकारे जबाबदारी घेत संघाला अंतिम सामान्यांपर्यंत नेले होते त्याच संघाला अश्या प्रकारे पराभव पत्करावाला लागेल याचा विचार कोणी केलाही नसेल. रॉयल्सचा बचावात्मक पवित्रा जवळजवळ स्पर्धेतून बाहेर गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आजच्या सामन्यात ततगड्या मुंबईविरुद्ध करण्यासारखे असे काही नव्हते. नाणेफेक जिंकून रॉयसाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी स्वीकारली. थोडेसे गवत असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीच योग्य असली असती असे मत रोहित शर्मानेही व्यक्त केले. मंदीप सिंगच्या जोडीने डावाची सुरुवात करत कोहलीने पहिल्याच चेंडूपासून धावा करण्यास सुरुवात केली. मंदीप सिंगची चांगल्या फॉर्मात खेळताना दिसला. मिचेल मॅककलेनेघनच्या पहिल्याच षटकात दोन चौकार खेचत मंदीपने तसे संकेतही दिले. हरभजनच्या जागी खेळणाऱ्या कर्ण शर्माला चौथ्या षटकात कोहलीनेही षटकार खेचत आपणही आज आक्रमक आहोत असे दाखवून दिले. चौथ्याच षटकात एक स्लॉग स्लिप मारण्याच्या नादात मंदीप (१७ धा. १३ चें. ३ चौ.) हार्दिक पांड्याकडे झेल देत बाद झाला आणि बंगळुरूला पहिला धक्का बसला. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात कोहलीही रोहित शर्माकडे मॅककलेनेघनच्या गोलंदाजीवर सोपा झेल देत तंबूत परतला आणि उपस्थित वानखेडेचे प्रेक्षक आनंदित झाले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या एबी डीविलियर्सने याच षटकात एक चौकार व षटकार खेचत पुन्हा एकदा धावफलक वाढवला. मधल्या फळीची कामचलाऊ फलंदाजी मंदीप-कोहली ही जोडी तंबूत परतल्यानंतर एबी डीविलियर्सने आपल्याकडे जबाबदारी घेतली. हेडच्या साथीने या दोघांनी ३२ चेंडूंत चौथ्या गड्यासाठी ४५ धावा जमवल्या. हेड (१२ धा. १५ चें.) कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर भाऊ हार्दिककडे झेल देत बाद झाला. खेळपट्टीचा अभ्यास करून सेट दिसणारा एबी डीविलियर्सही कृणाल पांड्याचा शिकार ठरला आणि शॉर्ट फाईन लेगला जसप्रीत बुमराकडे झेल देत बाद झाला. कृणाल पांड्याने एबी डीविलियर्सला इंडियन प्रीमियर लीगमध्ये तब्बल चार वेळा बाद करण्याचा पराक्रम केला. एबी डीविलियर्सने २७ चेंडूंत ३ चौकार व तितकेच षटकार खेचत ४३ धावा केल्या. संघामध्ये आत-बाहेर असलेला शेन वॉटसन (३ धा. ५ चें.) आजही फेल ठरत बुमराच्या योर्करचा बळी ठरत बाद झाला. पाच आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एका भक्कम भागीदारीची आवश्यकता होती. अश्या परिस्थितीत त्यांच्यासाठी धावून आले ते केदार जाधव व पवन नेगी. १४ व्या षटकापासून दोंघांनीही डावाची सूत्रे आपल्या हाती घेत सावधपणे धावा करण्यास सुरुवात केली. भागीदारीतील पहिल्या १६ चेंडूंवर एकही चौकार षटकार न मारता मुंबईच्या गोलंदाजांना सावधपणे हाताळले. १७ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बुमराला चौकार खेचत केदार जाधवने भागीदारीतील पहिला चेंडू सीमारेषेबाहेर धाडला. पुढच्याच षटकात नेगीने मलिंगाला दोन षटकार खेचत तब्बल १५ धावा कुठल्या. शेवटच्या षटकात हि भागीदारी फोडण्यात मुंबई इंडियन्सला यश आले. मॅककलेनेघनने दोघांनाही पोलार्डकडे झेल देत बाद केले आणि २० षटकांच्या अखेरीस रॉयल चॅलेंजर्सला १६२ धावांत रोखले. नेगीने ३५ धावा (२३ चें. १ चौ. ३ ष.) तर जाधवने २८ धावा (२२ चें. २ चौ.) केल्या. मुंबईतर्फे मिचेल मॅककलेनेघनला सर्वाधिक ३ बळी टिपता आले. बटलरची आक्रमक खेळी मुंबईच्या डावाची सुरुवात पार्थिव पटेल बाद होत झाली. अनिकेत चौधरीने शॉर्ट चेंडू टाकत पूल मारण्यास आमंत्रित केलेल्या पटेलला चहलकरवी झेल देत बाद केले आणि मुंबईला खाते खोलण्याच्या आधीच पहिला धक्का दिला. मुंबईला सुरुवातीचे सामने जिंकून देणाऱ्या नितीश राणाने जोस बटलरसह संयमी फलंदाजी करीत मुंबईच्या डावाला हवी तशी सुरुवात करून दिली. बटलरने ऍडम मलिनला तिसऱ्या षटकात तीन चौकार खेचत षटकात १७ धावा कुटल्या. पावरप्लेपर्यंत मुंबई इंडियन्सने पार्थिव पटेलच्या रूपात गडी गमावत ५५ धावा केल्या होत्या. बंगळुरूच्या गोलंदाजांना पहिल्या चेंडूनंतर यश न मिळाल्यामुळे कोहलीने पवन नेगीला पाचारण केले आणि त्याची हि खेळी सफल झाली. नेगीने बटलरला (३३ धा. २१ चें. ४ चौ. १ ष.) बाद करीत दुसरे यश मिळून दिले. नेगीने दहाव्या षटकात सावध पवित्रा घेतलेल्या नितीश राणालाही बाद करीत मुंबईला तिसरा धक्का देत सामन्यात पुनरागमन केले. रोहित शर्माची ‘कॅप्टन’ इंनिंग अधून-मधून फॉर्मात येणाऱ्या रोहित शर्माने आज आपल्या घराच्या मैदानावर उपस्थित प्रेक्षकांना रविवारची मेजवानी देत आणखी एक कर्णधाराला साजिशी खेळी करत मुंबई इंडियन्सला मोसमातील आठवा विजय मिळवून दिला. दहा सामन्यांत मुंबई इंडियन्सचा हा आठवा विजय असून केवळ रायसिंग पुणे सुपरजायंट विरुद्धचे दोन पराभव वगळता सर्व संघांना मुंबईने लोळवले आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या रोहितने काही वेळ तग धरत मुंबईची खेळपट्टी पुरेपूर चापली. रोहित शर्माने करणं शर्माच्या साथीने ३ षटकांत २९ तर हार्दिक पांड्याच्या साथीने २० चेंडूंत नाबाद ३५ धावांची भागीदारी करीत एक चेंडू शिल्लक ठेवत मुंबईला विजय मिळवून दिला. क्षेत्ररक्षण करताना जखमी झालेला कृणाल पांड्या फलंदाजी करतानाही जखमी झाला आणि मुंबईला एका प्रकारे धक्का बसला. रोहीतने ३७ चेंडू खेळत सहा चौकार व एक षटकार खेचत नाबाद ५६ धावा केल्या तर हार्दिक पांड्याने ९ चेंडूंत १४ धावा करत रोहितला उत्तम साथ दिली.]]>