हाशिम आमलाच्या शतकानंतर बटलर-पटेलची वादळी खेळी व नितीश राणाची ‘षटकार’ फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाबचे १९९ धावांचे आव्हान केवळ १५.३ शतकांतच केवळ २ गडी गमावत पार केले. इंदोर: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या हंगामात आपला धडाडा कायम ठेवत मुंबई इंडियन्सने सहापैकी पाच तेही सलग सामने जिंकत आपण कोणत्याही आव्हानाला, कोणत्याही ठिकाणी व कसल्याही परस्थितीत तयार आहोत हेच दाखवून दिले. आजच्या सामन्यात तर एक चित्र-विचित्र व पिसाळलेली मुंबई इंडियन्स पाहायला मिळाली. किंग्स XI पंजाबने ठेवलेले १९९ धावांचे मोठे आव्हान मुंबई इंडियन्सने तब्बल २७ चेंडू व ८ गडी राखत पार करून यंदाच्या मोसमात १५ दिवसांत आपणच दादा आहोत हे सिद्ध केले. हाशिम आमलाच्या दमदार शतकानंतर मुंबई इंडियन्सला मिळालेल्या १९९ धावांचे आव्हान सुरुवातीपासूनच कोणताही दबाव न घेता मुंबईने आरामात पार केला. एरव्ही अगदी शेवटच्या षटकापर्यंत सामन्याचा निर्णय घेऊन जाणाऱ्या मुंबई इंडियन्सने आज वेगळाच पवित्रा घेतला. पावरप्ले मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ८२ धावा कुटत मुंबईने दणक्यात सुरुवात केली. पार्थिव पटेलच्या ३७ (१८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) धावा यात महत्वाचा भाग होता. मुंबईने यापूर्वी पावरप्लेमध्ये एवढ्या धावा कधीच केल्या नव्हत्या. बटलरही आपली छाप सोडत तुफानी फटकेबाजी करीत येथील होळकर मैदानावरील उपस्थित प्रेक्षकांना मनोरंजित करीत होता. त्यानेही पटेलप्रमाणे २०० हुन अधिक स्ट्राईक रेटने धावा जमवीत ३७ चेंडूंत ७७ धावा (७ चौकार, ५ षटकार) मुंबईच्या विजयाचा पाय रचला. मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत वरदायी ठरलेल्या नितीश राणानेही पटेल-बटलर प्रमाणे पंजाबच्या गोलंदाजांना पिसून काढले. आश्चर्याची बाब म्हणजे नितीश राणाने आज खेळलेल्या खेळीमध्ये एकही चौकार नव्हता. ३४ चेंडूंमध्ये केलेल्या ६२ धावांमध्ये त्याचे तब्बल ७ षटकार शामिल होते. तसेच यंदाच्या मोसमात त्याने सर्व सहा सामन्यांत ३ अर्धशतक ठोकत ३५५ धावांसह ‘ऑरेंज कॅप’ पुन्हा एकदा मिळवली. शिवाय आजच्या ७ षटकारांच्या जोरावर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पहिले स्थान मिळवले. तत्पूर्वी, रोहित शर्माने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शॉन मार्श – हाशिम आमला या जोडीने छानशी सुरुवात करीत पावरप्ले मध्ये आठच्या सरासरीने धावा जमवल्या. मार्शला मॅकग्लेघनने बाद केल्यानंतर बढती मिळाला सहाही काही विशेष करू शकला नाही. कृणाल पंड्यानें ११ धावांवर त्याला त्रिफाळाचित केले. नंतर कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने आमलासह सर्व सूत्रे हाती घेत मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः पिटले. मुंबईचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगालाची तर जबरदस्त पिटाई करीत आमलाने आपले आय. पी. एल. मधले पहिले शतक केले. मॅक्सवेलने केवळ १८ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा कुटल्या. कसोटी स्पेशालिस्ट असलेल्या हाशिम आमलाने ६० चेंडूचा सामना करीत ८ चौकार व ६ षटकार खेचीत नाबाद नाबाद १०४ धावा केल्या. त्याच्या या शतकाच्या जोरावर पंजाबने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर रचला. मुंबईकडून मॅकग्लेघनने सर्वाधिक २ गडी तर बुमरा, कृणाल पांड्या यांना प्रत्येकी १ गडी बाद करता आला मुंबईने या विजयाबरोबरच सलग ५ सामन्यांत विजय मिळवत पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान फटकावले. मुंबईचा पुढील सामना शनिवारी २२ तारखेला घराच्या वानखेडे मैदानावर दिल्ली डेअरडेविल्स बरोबर होईल. संक्षिप्त धावफलक: किंग्स XI पंजाब: १९८/४(२०) – आमला १०४*(६०), मॅक्सवेल ४०(१८) । मॅकग्लेघन २-४६(४), कृणाल पांड्या १-२९ (४) मुंबई इंडियन्स: १९९/२ (१५.३) – बटलर ७७(३७), राणा ६२ (३४) । स्टोइनीस १-२८ (२), मोहित शर्मा १-२९ (२.३) मुंबई इंडियन्स ८ गडी व २७ चेंडू राखून विजयी.]]>