संभाजीनगर(रूपेश बंगाळे) – केरळमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले थांबवण्यात यावे यासाठी निदर्शने करण्यात आली. या वेळी प्रचंड संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करीत होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा मंच तर्फे क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली. तसेच जोरदार घोषणा देण्यात आल्या. या वेळेस आमदार अतुल सावे, संभाजीनगरचे महापौर भगवान घडामोडे, विश्व हिंदू परिषदेचे संजय बारगजे, साहित्यिक डॉ. शिरीष देशपांडे, भारतीय मजदूर संघाचे दीपक भालेराव, अभाविप चे मोहन भिसे, भारत विकास परिषद चे देवजी भाई पटेल, संघाचे प्रांत प्रचार प्रमुख वामनराव देशपांडे, सहकार्यवाह हेमंत जोशी, राष्ट्रीय सुरक्षा मंच चे सुनील चावरे, भाजपच्या सविता कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थिती होते. निदर्शने झाल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन दिले.]]>