जळगाव (सागर कुळकर्णी) दि. १६ – जळगाव जिल्हा परिषद व त्या अंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या निवडणूक – २०१७ साठी जळगाव जिल्ह्यात २३८७ मतदान केंद्रावर आज मतदान झाले. जिल्ह्यात एकूण २१६०२०७ मतदार असून यात स्त्री मतदार १०२२१०१, पुरुष मतदार ११३८०९५, इतर मतदार ११. यापैकी आज झालेल्या मतदानात ६३५४५५ स्त्री मतदारांनी तर ७२१०१७ पुरुष मतदारांनी असे एकूण १३५६४७२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ६२.७९ टक्के मतदान झाले. जळगाव तालुक्यात सर्वाधीक ६७.४० टक्के तर भुसावळ तालुक्यात सर्वात कमी ५०.८९ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत व सुरळीत पार पडले असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.]]>