मुंबई दिनांक २३ नोव्हेंबर, २०१६: इंडियन सुपर लीगच्या ४६ व्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या यजमान मुंबई सिटी एफ. सी. संघाने आपला फॉर्म कायम ठेवत सातव्या स्थानावर असलेल्या चेन्नईयीन एफ. सी. संघावर सुरुवातीपासूनच दबाव ठेवला. गतविजेता चेन्नईयीन एफ. सी. संघाविरुद्ध आपल्या घराच्या मैदानावर मुकाबला करण मुंबईसाठी एक आव्हानच होत. परंतु मुंबईचा सध्याचा फॉर्म व आघाडीच्या खेळाडूंना गवसलेला फॉर्म मुंबईसाठी हितदायक ठरलं. सामना सुरु होताच सातव्या मिनिटाला गर्सन वीरा याला यलो कार्ड भेटलं. ए. एफ. सी. स्पर्धेत छाप सोडणाऱ्या सुनील छेत्रीला या स्पर्धेत अद्याप हवा तसा सूर गवसलेला दिसत नसताना त्यांना सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. ९ मिनिटाला मिळालेल्या पासवर त्याने गोल केला परंतु ऑफ साईडमुळेगोल वैध ठरला नाही. दोन्ही संघ सुरुवार्तीला काहीशे बचावात्मक दिसत असताना त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्याचाच परिणाम, मुंबईच्या डी फेडरिकोने ३२ व्या मिनिटाला मिळालेल्या पासवर अचूक वेध घेत मुंबईला खात उघडून दिले. दोन्ही संघाना अधूनमधून फ्री किक मिळाले परंतु सुरेख बचावामुळे कोणालाही गोल करण्यात यश आलं नाही. मुंबईचा गोलकीपर अमरिंदर सिंघ याने त्याचा सर्वोत्तम खेळ दाखवत चेन्नई संघाचे जवळ जवळ पाच गोल वाचवले. पहिल्या हाफ नंतर मुंबईने १-० अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. चेन्नई संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या सामन्यात विजय हा आवश्यक होता. पहिल्या हाफ मध्ये ०-१ ने पिछाडीवर असल्याने त्यांना दुसर्या हाफमध्ये गोल हा आवश्यक होता. लगेचच ४८ व्या मिनिटाला चेन्नईला कॉर्नर मिळाला, परंतु गोल करण्यास मात्र त्यांना यश मिळालं नाही. सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला मुंबईच्या सेहनाज सिंघ याला सामन्यातील दुसर यलो कार्ड मिळालं आणि चेन्नईला फ्री किक मिळालं. ६० व्या मिनिटाला कर्णधार फोर्लनच्या सुरेख पासवर क्रीस्तान याने अप्रतिम असा गोल पोस्टमध्ये धाडत मुंबईला २-० अशी मोठी आघाडी मिळवून दिली आणि सामना आपल्या बाजूने केला. याच गोलच्या जोरावर मुंबईने संपूर्ण सामन्यात आपली आघाडी कायम ठेवत चेन्नईवर दबाव टाकला. सामन्याची १० मिनिटे शिल्लक असताना सुनील छेत्रीला गोल करण्याच्या २ संधी मिळाल्या परंतु दोन्ही वेळेस अचूक निशाना साधण्यास तो अपयशी ठरला. मुंबई संघासाठी जमेची मोठी बाजू म्हणजे गोलकीपर अमरिंदर सिंघ याचा सुरेख बचाव. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्याने चेन्नई संघाला मिळालेल्या सर्व संधी फेल ठरवत मुंबईला मोठा हातभार लावला. मुंबईने गत विजेता चेन्नई संघाला मात करीत २२ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले. मुंबईचा पुढील सामना ३ तारखेला तगड्या दिल्ली बरोबर असेल.]]>