कुआनटन, मलेशिया: भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने आशियाई हॉकी चाम्पियंस स्पर्धेच्या अटीतटीच्या सामन्यात ३-२ ने मात करीत तमाम भारतीय क्रीडा रसिकांना दिवाळीची शानदार गिफ्ट दिली. साखळीच्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने उतरेल्या पाकिस्तानने भारताला तगडी टक्कर दिली. परंतु भारताच्या आक्रमण व अनुभवासमोर पाकिस्तानने अक्षरश्या नांगी टाकली आणि शेवटच्या काही मिनिटांतच भारताला विजय मिळवून दिला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. भारताने यापूर्वी २०११ साली पहिल्यावहिल्या स्पर्धेत याच संघाबरोबर दोन हात करीत भारताला विजय मिअवून दिला होता. त्यानंतर २०१२ भारताला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं होत. यंदाच्या अंतिम सामन्यात भारताने साजेशी कामगिरी करीत पूर्वार्धात दोन गोल करीत भारताला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. १८ व्या मिनिटाला कर्णधार रुपिंदर पाल सिंघने गोल करीत भारताच खात खोलले. लगेच २३ व्या मिनिटाला अफान युसुफने गोल करीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानच्या मुहम्मद बिलालने २६ व्या आणि अली शानने ३८ व्या मिनिटाला गोल करीत बरोबरी साधली. सामन्याची ९ मिनिटे शिल्लक असताना निक्कीनने गोल करीत भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली आणि भारताला विजय मिळवून दिला. काल भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकत दिवाळीची सुरुवात केली आणि आज लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर हॉकी संघाने विजय मिळवत भारतीय क्रीडा प्रेमींना मोठी दिवाळीची भेट दिली.]]>