पुणे, २१ सप्टेंबर (वार्ता.) – दाभोलकर कुटुंबियांनी त्यांच्या परिवर्तन न्यासामध्ये अनेक आर्थिक घोटाळे केले. वर्ष १९९२ ते २०१२ या २० वर्षांच्या कालावधीतील हिशोब धर्मादाय आयुक्तांना वेळेवर सादर केले नाहीत. न्यासाच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करावी, अशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शाळांमध्येही वैज्ञानिक जाणिवांसारखे प्रकल्प राबवून अंनिसने शालेय विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये जमा करून कार्यकर्त्यांना आलीशान गाड्या वाटण्यात आल्या. अंनिसच्या नरेश बनसोड या जिल्हाप्रमुखाला नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक झाली होती. व्यसनमुक्तीच्या नावाखाली अंनिसने अंबानींकडून १ कोटी रुपये घेतले. एवढे पैसे घेऊन अंनिसने व्यसनमुक्तीचे असे काय कार्य केले ? अंनिसची एवढी वादग्रस्त पार्श्वभूमी असतांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केवळ सनातन संस्थेला संपवण्यासाठी एकांगी तपास केला जात आहे. अन्वेषण यंत्रणा दाभोलकर कुटुंबियांच्या तालावर नाचत सनातनच्या निष्पाप साधकांचा छळ करत आहेत. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड निर्दोष असून त्यांचे निरपराधीत्व न्यायालयात सिद्ध होईलच. त्या वेळी मात्र अन्वेषण यंत्रणांसह सर्व पुरोगाम्यांचे नाक कापले जाईल. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांना जर खरे गुन्हेगार शोधायचे असतील, तर त्यांनी सर्व शक्यता गृहीत धरत दाभोलकर कुटुंबियांचीही चौकशी करावी. त्यातून सत्य बाहेर येईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.]]>