नारी संसदेला संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि व्यासपिठावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या महिला पदाधिकारी गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – हिंदु महिलांवरील अत्याचारांविषयी जागृती करण्यासाठी हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने डासना येथील प्राचीन देवी मंदिरामध्ये नुकतेच दोन दिवसीय हिंदु नारी संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आर्य समाज, हिंदू महासभा, वैदिक उपासना पीठ, विश्व हिंदू सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखंड भारत मोर्चा, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा या संघटनांच्या अनेक महिला पदाधिकार्यांनी त्यांची मते व्यक्त केली. या कार्यक्रमात लव्ह जिहाद पासून आपल्या मुलींना कसे वाचवायचे ? या विषयावर मुख्यत्वे चर्चा करण्यात आली. सरकारने मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या संसदेचे अध्यक्षपद संस्कार भारतीच्या प्रांत महिला प्रमुख श्रीमती बीना गोयल यांनी भूषवले. नगरसेविका शशी चौहान यांनी सांगितले की, डासना भागात ८५ टक्के मुसलमान आहेत. येथून मोठ्या प्रमाणात हिंदू पलायन करत आहेत, तसेच लव्ह जिहादच्या घटनाही वाढत आहेत. क्षणचित्रे १. लव्ह जिहादचे स्वरूप उघड करणारी एक नाटिका सादर करण्यात आली. २. मध्यप्रदेश, भाग्यनगर, डेहराडून, जयपूर, प्रयाग आदी भागांमधून मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या.]]>