वेंटिलिटेर ऑक्सिजन पासून रुग्ण वंचित नागपुर: राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या गावातील तसेच विदर्भातील सर्वात मोठे हॉस्पिटल म्हणून ज्याची ओळख संपूर्ण राज्यात आहे, अशा नागपुर मेडिकल कॉलेजमध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर राज्यातून ही रुग्णांची ओढ़ या शासकीय रुग्णालयाकड़े असते, परंतु या रुग्णालयातील वार्ड तर सोडाच अतिदक्षता विभागात सुद्धा कुठल्याही पद्धतीचे वेंटिलिटेर उपलब्ध नाही त्याच बरोबर इतर सुविधा सुद्धा येथे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे, डॉक्टरांच्या माहिती नुसार या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही लोक प्रतिनिधीने लक्ष केंद्रित केले नसून या मेडिकल कॉलेजच्या खस्ता व गंभीर परिस्थिति कड़े मुख्यमंत्री ध्यान केंद्रित करतील का? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडला आहे. याअगोदर सदर प्रकरणाला उजाळा देण्याचे काम स्थानिक प्रसार माध्यमांनी केला होता, परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष न देता दुर्लक्षच केले आहे. संपूर्ण राज्यात नागपुर मेडिकल कॉलेज हे विदर्भाचे रुग्णांसाठी केन्द्र बिंदु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री याकडे काय लक्ष देणार का????? 〰〰〰〰〰〰〰 (श्री. संदिप बाजड:- विदर्भ प्रतिनिधी)]]>