मोहाली: महेंद्र सिंघ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने तगड्या ऑस्ट्रेलिया संघावर ६ गड्यांनी विजय मिळवत टी २० विश्व चषक स्पर्धेत सलग दुसर्यांदा उपांत्य फेरीत मजल मारली. विजयाचा शिल्पकार ठरला तो भारताचा भरवशाचा फलंदाज व भारताची नवी भिंत ‘विराट कोहली’. दोन्ही संघाना आवश्यक असलेल्या सामन्यात भारताने विराटच्या जबर खेळीच्या जोरावर अटीतटीच्या सामन्यात भारताला विजश्री खेचून आणले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत दमदार सुरुवात केली. पहिल्या सहा षटकात तब्बल १० च्या सरासरीने धावा करीत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. भारताचा अव्वल गोलंदाज अश्विनच्या पहिल्या षटकात तब्बल २२ धावा कुटल्या. परंतु नंतर भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करीत पाहुण्यांना १६० धावांत रोखलं. संपूर्ण स्पर्धेत भारताची डोकेदुखी ठरलेली भारताची सलामी जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. त्यानंतर आलेल्या रैनानेही आपला खराब फॉर्म कायम ठेवत भारतीय संघाला अडचणीत पडले. एका बाजूने तग धरून बसलेल्या विराट कोहलीने ५व्या क्रमांकावर आलेल्या युवराज सिंघच्या जोडीने भारताला विजयाकडे आणले. युवराज सिंघ दुखापतीमुळे काही काळ अडचणीत आला होता. युवराज बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार धोनीने कोहलीच्या साथीने भारताला १२ च्या सरासरीने धावा ठोकत २० च्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. धावफलक: ऑस्ट्रेलिया १६०/६(२०) ख्वाजा ४३(३४), मॅक्सवेल ३१(२८), पांड्या २-३६, युवराज १-१९ भारत १६१/४(२०) कोहली ८२*(५१), युवराज २१(१८), वॉटसन २-२३]]>