यांच्यावर असेल विशेष कामगिरी भारत: सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाची मदार संपूर्ण संघावर असेल. ऑस्ट्रेलियातील टी २० मालिका, श्री लंकेविरुद्ध मायदेशात मालिका व बांगलादेशमध्ये आशिया चषक अशा सलगच्या विजयानंतर भारत या सामन्यात नक्कीच वरचढ असेल. रोहित, धवन, कोहली, युवराज, रैना, धोनी यांची फटकेबाजी तर पांड्या, अश्विन, नेहरा, बूमरा यांच्यावर गोलंदाजीचा भार असेल. शमीच्या पुनरागमनानंतर भारतीय गोलंदाजी नक्कीच भक्कम ठरेल. न्यूझीलंड: मॅक्युलमच्या निर्वृत्तीनंतर कर्णधार केन विल्लिअमसनवर किवी फलंदाजीची जबाबदारी असेल. मार्टिन गुप्तील, रॉस टेलर यांच्यावरही विशेष कामिगीरीची नजर असेल. नाथन मॅक्युलम, इलियट, कोरी अँडरसन यांच्यावर अष्टपैलू कामगिरीची जबाबदारी असेल. बोल्ट, साउथी यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल. उद्या भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ०७ वाजून ३० मिनिटांनी स्टार स्पोर्ट्स वर थेट प्रक्षेपण पाहता येईल.]]>